
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
यवतमाळ
अवघ्या काही दिवसांवर बैलपोळा जवळ येऊन ठेपला आहे वर्षभर शेतकऱ्याचा खरा मित्र साथीदार यांच्या प्रति कुठेतरी ऋण व्यक्त करायचा दिवस असून घुंगरं, कसाट्या, कवड्याचीमाळ, पिंपळपान, तसेच बैलाच्या शेपटीला गोंडा अगदी सुबकपणे कापून तयारी चालू असताना रंगीबेरंगी असलेली साजाणे बाजारपेठ सजली या सणाला शेतकरी सुद्धा खर्चाला मागेपुढे पाहत नाही वर्षभर अगदी प्रामाणिकपणे साथ देऊन धूर म्हणले की धुरणारा एकमेव साथीदार म्हणजेच बैल होय यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात भरभराट आली आणि शेतकऱ्याची वर्षभराची दारोमदार टिकवून ठेवण्यासाठी बैलांचा फार मोठा सहभाग असतो तसे बघता कितीही यांत्रिकीकरण झाली तरी ज्या शेतकऱ्यांना बैल बाळगण्याचा एक प्रकारे छंद आहे तो शेतकरी बैलाशिवाय राहू शकत नाही तो बैलजोडी आपल्या दारासमोर ठेवणारच हे त्रिवार सत्य
हल्ली आपण बघतोच आहे की सर्व लहान मुले मोबाईलच्या विळख्यात गुंतले आहे त्यामुळे शहरी भागात बैल केवळ चित्रातच बघायला मिळते की काय अशी अवस्था होऊन बसली आहे. ज्या शेतकऱ्याकडे दोन बैल जोड्या आहेत त्यांच्याकडे केवळ नाममात्र बैलजोडी बघायला मिळत आहे त्यामुळे येणाऱ्या पिढीला माहीत व्हावे पूर्वजांपासून चालत आलेली प्रथा परंपरा ती टिकून राहावी म्हणून बहुदा तान्या पोळ्याचे नियोजन पूर्वजांनी आखले असावे पोळा हा सण झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी तान्ह्या पोळ्याचे आयोजन केले जाते त्या अनुषंगाने पांढऱ्याशुभ्र रंगाच्या व अनुकृतीदार शिंगाची बैल विकण्यासाठी बाजारात उपलब्ध झाले असून काही लहान मुले ही रंगीबेरंगी बैल शाळेत जाताना तासनतास ऊभे राहून बघत असून शाळेतून घरी आल्यानंतर बैलजोडी विकत आणण्याचा हट्ट विशेष करून आपल्या पालकांकडे करताना बघायला मिळत आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून तान्या पोळ्यानिमित्त बैलजोड्या बनवीत असतो हे बनण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून तयारी चालू होती मातीचे व प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे बैल विकत घेण्यासाठी लहान मुले आवर्जून येत असून दोन वर्षांपूर्वी कोरोना काळात नक्कीच व्यवसायावर परिणाम झाला बैल बनवण्यासाठी जे साहित्य लागते त्यात थोडीफार महागाई झाल्यामुळे काही प्रमाणात किमती वाढल्या असल्या तरी प्रथापरंपरा ती टिकून अबाधित राहावी व हा पिढीजात व्यवसाय असल्याकारणाने ना नफा ना तोटा अशा पद्धतीने सध्या विक्री चालू आहे.
सुभाष अंबादास चापके
मूर्तिकार
