
वणी :- येथील पोलीस स्टेशन मधील एक पीएसआय व एका जमदारामध्ये काल ता.२९ च्या रात्री ११ वाजताच्या सुमारास शुल्लक कारणावरून चांगलीच फ्री स्टाईल झाल्याची पोलीस वर्तुळात चर्चेला उत आला आहे.
वणी पोलिसांच्या सुस्तवलेल्या कारभारामुळे शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत जात असल्याने जनमानसात प्रचंड भीती पसरली असता पोलिसांच्या कार्यप्रणालीवर वंचित बहुजन आघाडीने प्रश्न चिन्ह उपस्थित करून पोलीस अधीक्षक यांचेकडे लेखी निवेदन सादर करून पिलीसांचा कारभार सुधारण्यासाठी कळविले आहे. यातच काल रात्री ११ वाजता स्टेशन डायरीच्या साजा वरून जमादार व पीएसआय यांच्यात चांगलीच फ्रिस्टाइल झाल्याचे खात्री दायक वृत्त आहे. या प्रकाराने येथील पोलीस निरीक्षक किती कर्त्यवदक्ष आहे याची प्रचिती जनतेला येत आहे.
