
सहसंपादक: रामभाऊ भोयर
पतीच्या त्रासाला कंटाळून घमा संजय कारंडे वय 26) हिने स्वतःची मुलगी मीरा (वय 1वर्ष) हिला सोबत घेऊन शुक्रवारी दि.26 एप्रिल 2024 रोजी सकाळी 12 च्या सुमारास विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना चिखली शेत शिवार राळेगाव तालुक्यात घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की फिर्यादी बुकदेव बाळकृष्ण सोनाळे (रा.बोरजई) हे मृतक घमा संजय कारंडे हिचे वडील असून त्यांनी पोलीस स्टेशन राळेगाव ला जबानी रिपोर्ट दिल्यानुसार मृतक घमा संजय कारंडे व आरोपी पती संजय चिमा कारंडे हे मेंढपाळ चा व्यवसाय करण्या करता मौजा चिखली ता.राळेगाव येथील विनोद ठाकरे यांच्या शेतात दोन दिवसांपासून ठाण मांडून होते परंतु आरोपी संजय कारंडे हा त्याची मृतक पत्नी घमा कारंडे हिला मागील एक वर्षा पासून नेहमीच दारूच्या नशेत मारहाण करीत असे ही माहिती फिर्यादी ची मुलगी घमा कारंडे स्वतः आई बाबा ला सांगत होती परंतु संजय कारंडे हा चुलत भाचा असल्याने त्यावर बारकाईने लक्ष देण्यात आले नाही त्याचाच फायदा घेत आरोपी संजय कारंडे यांनी मृतक घमा संजय कारंडे हिला नाहक त्रास देने सुरूच ठेवले त्यामुळे आरोपीच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून स्वतः आणि एक वर्षाची मुलगी मीरा हिला सोबत घेऊन विहिरीत उडी मारून जीवनयात्रा संपवली.
या घटनेबाबत माहिती समजताच राळेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रणती लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ नितीन गेडाम व चिव्हाणे साहेब यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व पुढील तपासा करिता मृतदेह शवविच्छेदन करिता ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे आणण्यात आला यावरून आरोपी संजय चिमा कारंडे यांच्या विरोधात भादवी कलम 306 नुसार गुन्हा दाखल झाला असून वृत्त लिहेपर्यंत आरोपीला अटक झाली नव्हती म्हणून पोलीस स्टेशन राळेगाव या प्रकरणावर कशाप्रकारे न्याय मिळवून देतील म्हणून सर्व समाजाचे लक्ष लागले आहे.
