कुपोषण मुक्त होण्याकरिता अंगणवाडी केंद्र उमरी तूकूम अंतर्गत पोषण आहार अभियान रॅली


(पोंभूर्णा) अंगणवाडी केंद्र उमरी तूकूम व “पाहणारे डोळे आणि मदतीचे हात” बहुद्देशीय सामाजिक संस्था उमरी पोतदार यांच्या सयुक्त विद्यमाने आज उमरी तुकुम येथे पोषण आहार जनजागृती अभियान राबविण्यात आले. या माध्यमातून कुपोषण मुक्त गाव, तालुका, जिल्हा, राज्य,भारत देश कुपोषण मुक्त होईल असा संदेश देण्यात आला. कुपोषणा पासून दूर राहण्याकरिता आपल्या लहान बाळांना योग्य पूरक आहार देत चला “सही पोषण देश रोशन” अशे वेगवगळे नारे यावेळी देण्यात आले . या रॅली मध्ये अंगणवाडी ची लहान बालके उपस्थित होती. सोबतच अंगणवाडी सेविका शारदा भेंडारे, मदतनीस किर्ती गदे्दकार, अंगणवाडी अमृताहार अध्यक्ष सौ वनिता सिडाम, आशा वर्कर अंतकला हजारे व सामाजिक संस्थेचे अंकुश उराडे, संदिप यम्पलवार,निखिल झबाडे,अमित कुमरे,निखिल झुरमुरे,भिमराव मेश्राम,अविनाश लेनगुरे, तेजराज सिडाम, चंद्रकांत सिडाम,नदिम कुमरे,विक्रम लेनगुरे,मनिष ठाकरे, चेतन कावळे, अंकुश लेनगुरे, महेश कुलमेथे अनंत शेंडे उपस्थित होते.