
पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिनी दरवर्षी राज्य पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात येते. या पुरस्कारासाठी यावर्षी जिल्ह्यातील १२ पोलिस अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून, राज्याच्या ६४ वर्धापनदिन कार्यक्रमात सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
चंद्रपुर जिल्हा पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांची उत्तम कामगिरीबद्दल उल्लेखनीय प्रशंसनीय सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे बोधचिन्ह/सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्राकरिता १) श्रीमती राधिका सुनिल फडके पोलीस उपअधीक्षक (मुख्या.) चंद्रपुर २) चरणदास कुसन दाजगाये, जिल्हा विशेष शाखा चंद्रपुर 3) घनश्याम हावसुजी गुरनुले, पो.स्टे. माजरी ४) चंद्रकांत श्रीहरी पेंद्दीलवार, नक्षल विरोधी अभियान पथक, चंद्रपूर 5) अरुण लक्ष्मण हटवार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपुर 6) राजेश केशवराव वऱ्हाडे, पो.स्टे. वरोरा. ७) लायक महादेव ढाले, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय चंद्रपुर. ८) इंद्रपाल सुकराम गोंगले पो.स्टे. घुग्घुस ९) अशोक नामदेवराव गर्गेलवार पो.स्टे. पडोली १०) पुरुषोत्तम कैलास चिकाटे. पो.स्टे. रामनगर ११) प्रशांत ताराचंद लारोकर, पो.स्टे. सायबर चंद्रपुर १२) प्रविण चंदु रामटेके, पो.स्टे. वरोरा यांची मा. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडुन निवड झाल्याबाबत मा.रविंद्रसिंग परदेशी, पोलीस अधीक्षक, चंद्रपुर व मा. रिना जनबंधु, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांनी पदक प्राप्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांना शुभेच्छा दिल्या व त्यांचा गौरव करण्यात आला.
सदर पोलीस महासंचालकाचे बोधचिन्ह / सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र महाराष्ट्र दिनाच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक ०१ मे, २०२३ रोजी मा. पालकमंत्री यांचे हस्ते प्रदान करण्यात येत आहे.
