ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या तालुका अध्यक्ष पदी परमेश्वर सुर्यवंशी यांची निवड

हिमायतनगर/ तालुका प्रतिनिधी


माणुसकी सोशल फाऊंडेशन संचलित ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या हिमायतनगरतालुकाध्यक्ष पदी परमेश्वर सुर्यवंशी करंजीकर यांची निवड करण्यात आली. परमेश्वर सुर्यवंशी हे मोदी समर्थक त्याच बरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक म्हणून काम केले त्याच बरोबर मागील अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय, पत्रकारिता या क्षेत्रात काम करतात.
हिमायतनगर तालुक्यात त्यांचा जनसंपर्क तसेच तळागाळातील व्यक्ति, गोरगरीब लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी केलेले प्रयत्न या सर्व बाबींचा विचार करून संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. विनित राम साळवी, महाराष्ट्र राज्य अध्यक्षा मा. अजिता घोडगावकर, राष्ट्रीय अध्यक्ष मा. दादाभाऊ केदारे यांनी निवड करून नियुक्ती पत्र दिले.सुर्यवशी यांच्या कडे भारतीय जनता पार्टी हिमायतनगर तालुका सरचिटणीस म्हणुन करतात भाजपचे कार्यकर्ते म्हणून त्यांची छाप आहे त्यामुळे जनतेच्या समस्या मांडण्यासाठी तो सतत कार्यरत राहतात त्यामुळे आता त्याच्याकडे नवीन जबाबदारी पडली आहे तालूक्यात त्यांच्या निवडी बद्दल शुभेच्छा चा वर्षाव होताना दिसुन आले मित्र परिवार यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहे