
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील धानोरा येथील नागरिक गणराज्य दिनी म्हणजे 26 जानेवारीला बिरसा मुंडा पुतळ्याजवळ ठिक 11 वाजता उपोषणाला बसले. दि. 24/1/2024 ला तहसीलदार राळेगाव व गटविकास अधिकारी राळेगाव यांना देण्यात आले आहे. राळेगाव तालुक्यातील धानोरा येथील वार्ड क्र 3 मधील गोर गरीब अनेक दिवसांपासून रहिवासी असलेल्या लोकांना पट्टे देण्यात यावे तसेच, धानोरा येथील गोर गरीब, भूमिहीन, अतिगरजाऊ, ओ. बी. सी. लोकांना मोदी आवास योजनेचा लाभ देण्यात यावा यासाठी दि. 26 जानेवारीला धानोरा येथील प्रमोद रमेश ढाले, मारोती बोरकर, गजानन देविदास सुरकर, अरूण आत्राम, सुधीर हटवार, राजु मेश्राम, हे सर्व उपोषणाला बसणार असल्याचे निवेदनात म्हटले होते, शासन या लोकांना न्याय देणार का धानोरा येथील वार्ड क्र ३ मधील जनतेला पट्टे मिळणार का? ओ. बी. सी. गोर गरीब, भूमिहीन जनतेला मोदी आवास योजनेंतर्गत लाभ मिळणार का हे सर्व प्रश्न जनतेला पडला आहे हे मात्र विषेश निवेदन देते वेळी जितेंद्र कहुरके, प्रमोद ढाले, मोरोती बोरकर, संजय कन्नाके, विजय मेश्राम, गजानन सुरकर, अशोक जुमनाके, सुधीर हटवार, राजु मेश्राम, किरण बिटे, सुनील हटवार, व गावातील अनेक नागरिक हजर होते.
