
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यात महिनाभऱ्यापासून आठ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी २० डिसेंबर रोजी थांबली असून गावकऱ्यांनी निवडणुकीत गावचा कारभारी म्हणून मतदारांनी सरपंच व सदस्य निवडून दिले आता लवकरच उपसरपंचाच्या निवडी होतील व त्या सदस्याच्या बळावर म्हणजेच सदस्य उपसरपंच निवडणार आहेत त्यासाठी उपसरपंच कोण त्यासाठी इच्छुकांनी गावातील पक्षश्रेष्ठींकडे भेटीगाठी सुरू केले आहे.
उपसरपंच पदाकरिता बहुमताचे आकडे पोहोचण्यासाठी गाव पुढार्यांकडून फोनाफोनी सुरू झाल्याने राजकारण पुन्हा तापल्याचे दिसून येत आहेत
राळेगाव तालुक्यात आठ ग्रामपंचायत करिता सरपंच सदस्यांची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली असून ग्रामपंचायत निवडणूकित ग्रामीण भागातील राजकारण ढवळून निघाले होते थेट जनतेतून गाव कारभारी विराजमान झाले आता सहकारभारी कोण याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत उपसरपंच पद मिळवण्यासाठी आता गावात परत एकदा राजकारण सुरू झाले आहे बहुमताचा आकडा गाठण्यासाठी अनेक जण इच्छुक असल्याने कोणाला वेटिंग वर आणि कोणाला उमेदवारी द्यावयाची याचा निर्णय घेताना गाव पुढार्याची चांगली दमछाक होत असून उपसरपंच कोणाला द्यायचे यासाठी मोठी चुरस निर्माण झालेली दिसत आहे तसेच यावर्षी थेट सरपंच जनतेतून झाल्याने गावातील कारभार चालवताना सरपंचाला मोठी कसरत करावी लागणार आहे सरपंचा नंतर उपसरपंच महत्वाच्या पदासाठी इच्छुकां मध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू झाली आहे.
