
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील
सावरखेडा आरोग्य उपकेंद्र निष्क्रिय असल्याची ओरड सावरखेडा येथिल नागरिकांमधून होताना दिसत आहे. सविस्तर वृत्त असे आदिवासी भागातील नागरिकांच्या सोयीसुविदेच्या अनुषंगाने वरद प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या सावरखेडा येथे उपकेंद्र सुरू केले आहे. परंतु या उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या नागरिकांना कुठल्याही सोयी सुविधांचा लाभ मिळत नसल्याची ओरड येथील नागरिकांमधून होत आहे.
गावकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सावरखेडा आरोग्य उपकेंद्राने सावरखेडा येथील नागरिकांकडे चक्क दुर्लक्ष केले असल्याची ओरड होत आहे. सदर नियमांनुसार महिन्यातील आरोग्य मोहिमा राबवण्यात अपयशी ठरले आहे. सरकारी धोरणानुसार प्रत्येक उपकेंद्राने किमान महिन्यातून एकदा किंवा आवश्यकतेनुसार लसीकरण, आरोग्य शिबिरे, जनजागृतीचे कार्यक्रम आणि रोग प्रतिबंधक मोहिमा राबवणे बंधनकारक असते. मात्र, सावरखेडा उपकेंद्राकडून गेल्या काही महिन्यांपासून अशा कोणत्याही मोहिमांचे आयोजन झाल्याचे दिसून आले नाही. सावरखेडा
उपकेंद्र प्रमुख आणि ANM यांची जबाबदारी गावकऱ्यांना आरोग्य सेवा पोहोचवणे आणि मोहिमेचे नियोजन करणे असे येथील कर्मचाऱ्यांचे काम असते परंतु गावकऱ्यांच्या मते, सावरखेडा उपकेंद्रात अजून पर्यंत कुठल्याही प्रकारची मोहीम राबवली नाही असल्याचे येथील गावकऱ्यांकडून सांगितले जात आहे. सदर आरोग्य विभागाने गावामध्ये जनजागृती कार्यक्रमात दुर्लक्ष केले असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. सदर या सर्व बाबीकडे स्थानिक प्रशासन म्हणजे ग्रामपंचायत सरपंच, सचिव यांचे दुर्लक्ष होत असल्याने हा प्रकार होत असल्याचेही येथील नागरिकांकडून सांगितले जात आहे. तर येथील
गावकऱ्यांनी आरोग्य उपकेंद्राच्या विरोधात सबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार देऊन या उपकेंद्रा अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे
