
भर रस्त्यावर शासनाच्या नियमांचे उलंघन करून कोंबड्या आणि बकऱ्या शेळ्या कापून विकन्यास
मौजे सारखणी येथील ग्राम पंचायत कार्यालय यांच्या कडून विशेष मुभा देण्यात येत असल्याचे पहायास मिळतेमौजे सारखणी गावातून बस स्टँड कडे येणारा हा मार्ग महत्वाचा मानला जाणारा असून शेतात ये जा करण्यास शेतकरी यांच्या करिता हा प्रमुख मार्ग आहे
या मार्गावर शासकीय नियमा बाह्य शेळ्या मेंढ्या कोंबडी कापून मासाचे तुकडे आणि पाणी जाणीव पूर्वक फेकण्यात येत असल्याने शेतकरी गजानन पवार यांनी ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या कडे सदरील अतिक्रमण यांच्या कडे लक्ष देण्यास वारन वार विनवणी केली असता सदरील अतिक्रमण हटवण्यास ग्राम पंचायत यांनी असमर्थता दाखवल्याने शेतकरी गजानन पवार यांना स्वतःच्याच शेतात उपास असल्या कारणी ये जा करण्याचे थांबवले आहे
ग्राम पंचायत सारखणी कडून तोंड पाहून अतिक्रमण हटवण्यात येत असल्याचा आरोप देखील गजानन पवार यांच्या सह सुनील चव्हाण यांनी केला आहे