रिधोरा जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात घाणीचे साम्राज्य,शाळा व्यवस्थापन समितीचे दुर्लक्ष

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

  

राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथिल जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात घाणीचे साम्राज्य असल्याने विद्यार्थ्यांना साथरोग आजार होण्याची शक्यता असल्याने पालकांनी शाळा व्यवस्थापन समिती वर दाखवली आहे नाराजी सविस्तर वृत्त असे काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषद शाळेवर शाळा व्यवस्थापन समितीचे सभापती म्हणून गावचे प्रथम नागरिक सरपंच यांची निवड होत होती परंतु शासनाने शाळेच्या विकास कामात व इतरही कामकाजात अडथळा निर्माण होत असल्याने हा नियम बंद करून विद्यार्थ्यांच्याच पालकांना हा अधिकार दिला आहे आणि पालक सभेमधूनच शाळा व्यवस्थापन समितीचे सभापती, सदस्य यांची निवड करण्यात आली आहे. सदर शाळा संबंधित संपूर्ण विकास कामांचे अधिकार हे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीचे सभापती यांना देण्यात आले आहेत परंतु अजुनपर्यंत काही गावांतील जिल्हा परिषद शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीला आपले कर्तव्य काय आहे हे सुध्दा माहिती नाही तर जशी गावावर गाव पुढारी आपलीच सत्ता ठेवण्यासाठी धडपड करतात मात्र तशीच धडपड जिल्हा परिषद शाळेवर आपल्याच पक्षाचा सभापती व्हावं म्हणून धडपड करतात परंतु शाळा व्यवस्थापन समितीला अर्धवट माहिती व आपले अधिकार काय हे माहित नसल्या कारणाने शिक्षकांची डोकेदुखी वाढली आहे हे मात्र तीतकेच खरे आहे फक्त शाळा व्यवस्थापन समितीची निवड करतेवेळीच गाव पुढारी आपल्या मर्जीतील पालकांची निवड करुन शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करते हे तीतकेच खरे आहे फक्त एकदा शाळा व्यवस्थापन समितीची निवड झाली की शाळेकडे ना गाव पुढारी लक्ष देत ना समितीचे सभापती, सदस्य लक्ष देत यामुळे शिक्षकांची डोकेदुखी वाढली आहे. सदर शाळेच्या परिसरात घाणीचे साम्राज्य असल्याने विद्यार्थ्यांना साथरोग आजार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही सदर रिधोरा सह परिसरात डेंग्यू, मलेरिया सारख्या रोगाने डोके वर काढले आहे. सदर शाळेच्या परिसरात घाणीचे साम्राज्य असल्याने विद्यार्थ्यांना साथरोग आजार झाल्यास याला जबाबदार कोण? समिती की गाव पुढारी? असेही काही पालकांनी व गावातील युवकांनी बोलून दाखविले आहे.