मंदिराचे रखडलेले काम पुन्हा सुरु,गावकऱ्यांनी एकत्र येत घेतला पुढाकार


प्रतिनिधी: विलास राठोड उमरखेड तालुका (ग्रामीण )

उमरखेड तालुका अंतर्गत येणाऱ्या निंगनूर ग्रामपंचायत मधील नागेवाडी गावामध्ये मागील तीन ते चार वर्ष पासून मंदिराचे काम रखडले होते . श्री संत सेवालाल महाराज यांचे व तसेच जगदंबा मातेचे मंदिर नागेशवाडी येथील नायक अर्जुन केशव जाधव व तसेच कारभारी कैलास तुळशीराम राठोड सर्व गावकरी मंडळी सर्वांनी जगदंबा मंदिर परिसरात एकत्र येत सर्वांनी ग्रामसभा घेतली. त्या ग्रामसभेत नायक व कारभारी यांनी गावासमोर मंदिराबाबत चर्चा केली तेव्हा गावातील लोक त्या चर्चेस सामील झाले. गावातील प्रत्येक घराने पाच हजार रुपये देण्याचे ठरवले त्यानुसार गावामधून पाच लाख रुपये जमा केले आणि रखडलेल्या कामाला सुरुवात करून अपूर्ण काम हे गावकरी मंडळीनी पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला व काम पुन्हा सुरू करण्यात आले.