
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक करणारी स्विफ्ट कार पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई 13 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री गॉर्डन तलावाजवळ पोलिसांनी केलेल्या नाकेबंदी दरम्यान करण्यात आली.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कळब येथून राळेगावकडे पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून विनापरवाना देशी दारू येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सपोनि, पोउपनि बोरकर, सफौ रामगडे, नापोका विशाल कोवे व इतरांनी नाकेबंदी करून कार क्रमांक MH 12 KE 8852 थांबवली.
तपासणीदरम्यान कारच्या मागील सीटवर 15 खाकी रंगाचे बॉक्स सापडले. प्रत्येक बॉक्समध्ये 48 पव्वे, असे एकूण 720 नग 180 ML देशी दारू (गोवा नं. 1 संत्रा कंपनीचे) आढळून आले. पव्व्यांची किंमत प्रत्येकी 80 रुपये प्रमाणे एकूण किंमत 57,600 रुपये, तर वाहनाची अंदाजित किंमत 3,00,000 रुपये, असा मिळून एकूण 3,57,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
घटनास्थळावर प्रकाशाची व्यवस्था नसल्याने आरोपी व वाहनाला पोलीस स्टेशनमध्ये आणून पंचासमक्ष पंचनामा करण्यात आला. एक पव्वा रासायनिक परीक्षणासाठी वेगळा करून सीलबंद करण्यात आला.
अटक आरोपी :
जितेंद्र दलीक लढे (वय 35, रा. कानगाव, ता. हिंगणघाट, जि. वर्धा)
शुभम प्रमोद कवडे (वय 27, रा. कानगाव, ता. हिंगणघाट, जि. वर्धा)
विनोद कुटे (वय 40, रा. कळब, ता. कळब, जि. यवतमाळ)
सदर आरोपी देशी दारू विनापरवाना बाळगून व वाहतूक करून महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (अ) (ई) चे उल्लंघन करत असल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
राळेगाव पोलीसांकडून ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास नापोका विशाल कोवे यांच्या मार्फत सुरू आहे.
