विदर्भातील मा.मधुसुदनभाऊ कोवे गुरुजी यांना छत्तीसगड येथे स्वांतत्र्य दिनी “गोंडवाना समाज रत्न” पुरस्कार देऊन केले सन्मानित….

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

गोंडवाना समाज महासभा छत्तीसगड यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विचारांचे पाईक राहुन समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा गौरव करण्यासाठी “गोंडवाना समाज रत्न पुरस्कार” कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र, मध्यप्रदेश तेलंगणा ओडीसा आणि छत्तीसगड मधिल समाज सेवक सरपंच उच्च श्रेणी अधिकारी यांना आमंत्रित करून स्वातंत्र्य दिनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे

गोंडवाना समाज महासभा कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अनुपजी नाग आमदार अंतागड विधानसभा क्षेत्र मा.निळकंठ टेकाम आय. ए. एस. कलेक्टर रायपूर (दुर्ग ) छत्तीसगड मा.भोजराज नाग माजी विधायक अंतागढ मा.कुंजारीलाल पवार सुखिया गोंडवाना समाज महासभा छत्तीसगड यांच्या हस्ते “गोंडवाना समाज रत्न पुरस्कार” समाजातील कर्तृत्ववान व्यक्तीना देण्यात आला आहे

विदर्भातील मा.मधुसुदनभाऊ कोवे गुरुजी यांच्या सामाजिक कार्याची माहिती संकलित करून गोंडवाना समाज महासभा छत्तीसगड यांनी स्वातंत्र्य दिनी “गोंडवाना समाज रत्न पुरस्कार” देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते विदर्भातील मा मधुसुदनभाऊ कोवे गुरुजी आदिवासी समाज सेवक आणि मा.मनोहरजी ऊईके यांना आदिवासी उद्योजक म्हणून “गोंडवाना समाज रत्न पुरस्कार” देवुन सन्मान करण्यात आला आहे

गोंडवाना समाज महासभा छत्तीसगड यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम चे आयोजक मा.अनुपजी नाग आमदार अंतागढ विधानसभा क्षेत्र मा.निळकंठ टेकाम आय.ए.एस.कलेक्टर मा.भोजराज नाग माजी विधायक अंतागढ आणि मा.कुंजारीलाल पवार यांनी आयोजित केलेल्या सन्मान कार्यक्रमा निमित्त विदर्भातील मा.मधुसुदनभाऊ कोवे गुरुजी यांनी छत्तीसगड येथील आयोजकांचे कौतुक केले आणि समाज बांधवांचे आभार मानले आहेत