
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शेतकऱ्यांचे सोयाबीन गेल्या एक महिन्यापासून निघणे सुरू आहेत काही शेतकऱ्यांचे अजून निघायचे आहेत दिवाळीच्या तोंडावर अनेक शेतकऱ्यांना आपले सोयाबीन हे विकावे लागले तालुक्यामध्ये नाफेडची खरेदी सुरू न झाल्याने त्या शेतकऱ्यांना आपले सोयाबीन मातीमोल भावात विकावे लागले .यावर्षी तालुक्यामध्ये ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती होती त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली एकरी एक क्विंटल पासून सोयाबीनचे उत्पादन शेतकऱ्यांना झाले दिवाळीच्या तोंडावर काही शेतकऱ्यांचे सोयाबीन घरी आले. दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांना सुद्धा पैशाची गरज असते त्यामुळे नाईलाजाने शेतकऱ्यांना आपल्याकडील सोयाबीन विकावे लागले सोयाबीन जेव्हा शेतकरी विकण्यासाठी गेला तेव्हा २५०० रुपयापासून शेतकऱ्यांना आपल्या सोयाबीन विकायला लागले सोयाबीनचा हमीभाव हा 5328 रुपये आहे पण अजून पर्यंत नाफेडणे सोयाबीनचे नाव नोंदणी सुद्धा सुरू केले नाही खरेदी तर दुरच आहेत दिवाळीपूर्वी नाफेडणे सोयाबीनचे नाव नोंदणी आणि खरेदी सुरू केली असती तर शेतकऱ्यांना आपल्याकडील सोयाबीन मातीमोल भावांमध्ये विकावे लागले नसते पण केवळ नाफेडची खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने आपले सोयाबीन व्यापाऱ्यांना द्यावे लागले बाहेर मार्केटमध्ये सोयाबीनला भावच नसल्याने व्यापारी सुद्धा सोयाबीनला सन्मान जनक भाव देऊ शकले नाही परिणामी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मातीमोल भाव मिळाला. सोयाबीन साठी भावांतर योजना शासनाने राबवावी. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मातीमोल भाव मिळत असल्याने आणि हमीभावामध्ये मोठ्या प्रमाणात फरक असल्याने शेतकऱ्याला क्विंटल मागे जवळपास दोन हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे मध्यप्रदेश शासनाच्या धरती वरती राज्यातही शासनाने सोयाबीन पिकासाठी भावांतर योजना राबवली आणि भावातील फरक जर शेतकऱ्यांना रोख दिला तर तो शेतकऱ्यांना मोठा दिलासा ठरेल यामुळे सोयाबीन पिकासाठी शासनाने भावांतर योजना राबवावी अशी मागणी शेतकरी करत आहेत .सहा क्विंटल 13 किलोचे शेतकऱ्याला मिळाले केवळ 2914रुपये शेतकरी आपल्याकडील सोयाबीन विक्रीसाठी हिंगणघाटला घेऊन गेला तेव्हा त्याला सहा क्विंटल 13 किलोचे केवळ 2914 रुपये मिळाले पाचशे रुपये क्विंटल ने त्या शेतकऱ्याच्या सोयाबीन खरेदी केल्या गेले सोशल मीडियावरती बाजार समितीतील शेतकऱ्याची पावती ही फिरत आहेत म्हणजे केवळ पाचशे रुपये क्विंटल ने त्या शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी केल्या गेले यावरून सोयाबीन पिकाची अवस्था किती दयनीय आहे हे आपल्या लक्षात येते
