शहीद स्मारक विद्यालय यावली शहीद येथील शिक्षक श्री माहादेवराव डाखोडे सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

श्री माहादेवराव डाखोड सर हे रात्री 1:00 वाजता अनंतात विलीन झाले स्वर्गवासी डाखोडे सर हे सर्व विद्यार्थ्यांना 1984 मध्ये दहावीला विज्ञान आणि गणित हा विषय शिकवत होते सर्व शिक्षकांपैकी स्वर्गवासी डाखोडे सर त्यांचं.व्यक्तिमत्व हे वेगळच होतं त्यांची शिकवण्याची पद्धत ही खूपच सोप्या रीतीची असून सर्व विद्यार्थ्यांना ती समजून जात होती अशा पद्धतीने ते शिकवत होते त्यांच्या या दोन्ही विषयात सर्व विद्यार्थी चांगले पैकी परसेन्टेज घेऊन सर्व विद्यार्थी 1984 ला उत्तीर्ण झालो सरांचे मुळगाव वडूरा हे असून दर्यापूर तालुक्यात व अमरावती जिल्ह्यात हे गाव वसले आहे. ते शिक्षक असताना यावलीला विनोद श्री विनोद धर्माळे यांच्या घरी ते भाडेतत्त्वावर राहत होते शाळेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर ते आपल्या गावी वडूरा येथे परत गेले आणि तेथे उर्वरित आयुष्य सरांच्या पत्नी बरोबर आणि मुलांबाळां.बरोबर वयाच्या ७८ वर्षापर्यंत ते आपल्या वडूरा गावी राहून संसाराचे पालन पोषण करीत होते आज हे व्यक्तिमत्व दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले त्यांच्या संसारातून. व. आमच्यातून निघून गेले त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना व त्यांच्या सुखी परिवारांवर दुःखाचे डोंगर कोसळले आज दिनांक 6/8/2024 ला त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले सर्व विद्यार्थ्यांनी व त्यांच्या परिवारांनी नातेवाईकांनी मित्रमंडळींनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली सर्व विद्यार्थ्यांना असे एकमेव शिक्षक या विषयाला लाभले होते त्यामुळेच उत्तीर्ण होऊन सर्व विद्यार्थी पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी स्वतःच्या पायावर सज्ज झालो असे व्यक्तिमत्व आज आमच्यातून निघून गेले त्यामुळे पुनश्च सर्व विद्यार्थी विनोद धर्माळे सुरेश वाघमारे सतीश उमप अजय देशमुख अरुण देशमुख सुनील देशमुख मनोज विंचुरकर जितेंद्र यावलीकर अरुण यावलीकर छोटू विधाते अजय पाचघरे राजेंद्र वसुले प्रमोद पाचघरे. अजय ठाकरे मोहन खवले आणि सुभाष सोनारे संजय खडसे. या सर्व वर्गमित्रांकडून सरांना मनःपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली .