राळेगाव पोलीस स्टेशनं अंतर्गत जप्त केलेली देशी दारू व गुटखा नष्ट

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

पोलीस स्टेशन राळेगाव येथे दारूबंदी कायद्यान्वये प्रलंबित असलेला 1000 रुपये आतील 18 गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल देशी दारू 180 एम एल क्षमतेचे 175 नग पवे किंमत 12060 मुद्देमाल माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब पांढरकवडा यांच्या आदेशान्वये पोलीस स्टेशन च्या आवारात दोन पंचा समक्ष खड्डा करून नाश करण्यात आला.
सन 2020 मधील पोलीस स्टेशन मध्ये जप्त असलेला DJ,MAZA,SAGAR कंपनीचा गुटखा तंबाखू पुड्या
एकूण वजन 25 किलो 450 ग्रॅमचे किंमत 24500 रु मा कोर्ट निकाल नंतर अन्न व औषध प्रशासन विभाग ची परवानगी घेऊन मुद्देमाल पंचा समक्ष नाश करण्यात आला अशी माहिती राळेगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार रामकृष्ण जाधव यांनी दिली.