
सहसंपादक : रामभाऊ भोयर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे 300 वी जयंती निमित्ताने स्थानिक वंजारी चौक येथील अहिल्यादेवी होळकर स्मारक सभागृहात दिनांक 25 मे 025 रोजी आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला,यात होमगार्ड वर्धा पथकाच्या समादेशक अधिकारी श्रीमती हेमलता श्रीरामजी कांबळे यांचा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल भाजप महिला आघाडी च्या अध्यक्ष श्रीमती वैशाली येरावार यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले, श्रीमती कांबळे यांनी अनेक सामाज उपयोगी कार्य केले असल्याने त्यांचे कार्याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे जिल्हा महामंत्री श्रीमती अर्चना वानखेडे उपस्थित होत्या, श्रीमती अर्चना वानखेडे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन चरित्र व त्यांचे समाजउपयोगी कार्याची माहिती दिली, कार्यक्रमाची प्रस्तावना वंदना भुते यांनी तर कार्यक्रमाचे संचालन श्रीमती श्रेया देशमुख यांनी केले.
या प्रसंगी श्रीमती हेमलता कांबळे यांचे सह धार्मिक कार्य, योग प्रचार व प्रसार, सामाजिक कार्य इत्यादी करिता श्रीमती योजना ढोक,श्रीमती संजीवनी माने, श्रीमती अर्चना झलके, यांचा सुध्दा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी श्रीमती चित्रा ठाकूर प्रामुख्याने उपस्थित होत्या तसेच नीता सूर्यवंशी, राखी पांडे, सुमित्रा कोपरे, दुर्गा तिवारी, दुर्गा डायगव्हाणे,मनीषा मशांनकर, रजनी भोयर,रूपाली बडे, मंजु पाल, धनश्री दांडेकर, पार्वती राहनडाले, पुनम डकरे, कल्पना कामनापुरे सह अनेक महिला उपस्थित होत्या.
