
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड
महागाव पुस नदीच्या पुलावर जीवघेणे खड्डे पडले आहेत तीन दिवसापुर्वी या खड्यात एक कंटेनर अडकुन संपूर्ण वाहतुक बंद झाली होती .अनेकदा स्थानिकच्या सर्व वर्तमान पत्रातुन व सोशल मीडिया च्या माध्यमातुन ही बातमी टाकण्यात आली होती . प्रशासनाला अध्यापही जाग न आल्याने अखेर भाविक भाऊ भगत व त्यांच्या हेल्प फांऊडेशन युवा ब्रिगेडच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्वंयखर्चाने श्रमदान करुन आज हे खड्डे बुजविण्याचे काम केले .अनेक सामाजिक कार्यात भाविक भाऊ भगत हेल्प फाऊडेशन हिरीरीने भाग घेत असून त्यांच्या सामाजिक कार्याचे तालुक्यात सगळीकडे कौतुक होत आहे . आज प्रत्येक क्षेत्रामध्ये भाविक भाऊ भगत यांच्या नेतृत्वाखाली हेल्प फाउंडेशन कार्य करत आहे . तालुक्यामध्ये संपूर्ण 80 टक्के गावांमध्ये या फाउंडेशन ची शाखा स्थापन आहेत गोरगरिबांना पीडित लोकांना या फाउंडेशनचा मदतीचा हात मिळत आहे . कुठल्याही प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी हेल्प फाउंडेशन चे पदाधिकारी व कार्यकर्ते भाविक भाऊ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली तत्पर असतात आज या महामार्गावरील पुलावरील जीवघेणे खड्डे श्रमदानातून भाविक भाऊ भगत यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमदानाने बुजविण्यात आले . या वेळी उपस्थित भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष भाविक भाऊ भगत जिल्हाध्यक्ष अनुप शेखावत , जिल्हा उपाध्यक्ष विष्णू चौधरी , जिल्हा संयोजक प्रमोद राठोड, तालुका अध्यक्ष शुभम वानखेडे , तालुका अध्यक्ष राजकुमार शिरगरे , तालुका उपाध्यक्ष शुभम राठोड , अपंग संघटना तालुका अध्यक्ष प्रेमानंद पांचाळ ,महागाव शहराध्यक्ष आकाश भागवतकर, तालुका संयोजक सौरभ तगडपल्लेवार, तालुका समन्वयक सत्यजित भोयर , विनोद भोयर विद्यार्थी संघटना , तालुका अध्यक्ष गणेश भागवतकर , उपाध्यक्ष पियुष हरणे, भाऊसाहेब शिंदे , शाखा प्रमुख विनोद सोळंके , निखील शिंदे , निकेश शिंदे , माधव दरोडे , दिनेश बावणे , मुकेश राठोड , सुदाम कवाने , अंकुश गोमासे , दत्ता पवार , मुकेश मस्के, समाधान चव्हाण , नीलेश राठोड , रुपेश मोरे ,गोविंदराव देशमुख व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
