चंद्रपूर जिल्ह्यात संमोहन प्रशिक्षण कार्यशाळा

एकाग्रता ,परीक्षा विषयक भीती अभ्यासाचा कंटाळा यातून मुक्त करण्यासाठी अभिनव प्रयोग

स्टेज शो संमोहन प्रशिक्षणाला उत्तम प्रतिसाद.

चंद्रपूर जिल्ह्यात विविध शाळामहाविद्यालयात विशेष तज्ञ संमोहन प्रशिक्षक मार्गदर्शक प्रा.अनराज टिपले, भीमलाल साव, हरिभाऊ डोलीर्रकर यांच्या नेतृत्वाखाली संमोहन प्रशिक्षण कार्यशाळा राबविण्यात आल्या .यात शालेय महाविद्यालय विद्यार्थ्या सहित ज्येष्ठ नागरिक स्त्रियांनीही सहभाग दर्शवला. जनता विद्यालय ताडाळी येथे आयोजित संमोहन प्रशिक्षण कार्यशाळेत (स्टेज प्रात्यक्षिक शो करिता) निवडक १० प्रशिक्षणार्थ्यांना प्रवेश देण्याच निश्चित झाले होते .परंतु संमोहनाविषयी विषयी आवड असणाऱ्यांचा वाढता ओघ लक्षात घेता. १०वरून २२ प्रशिक्षणार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. यात ४ ज्येष्ठ नागरिक होते. विविध शालेय महाविद्यालयातील १८ विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यशाळेत पालकांच्या सूचना वजा आग्रहात्सव आत्मासंमोहन स्वयं तंत्र शिकविले या तंत्राचा उपयोग त्यांना (मनाची एकाग्रता ,परीक्षेची भीती, अभ्यासाचा कंटाळा) इत्यादी समस्येतून मुक्त होण्यासाठी उपयोगी पडू शकते त्यावर विशेष भर देऊन मार्गदर्शन केले. संबंधित विषयासंदर्भात ४ प्रशिक्षणार्थ्यांना संमोहन स्टेज शो प्रशिक्षण देऊन चौथ्या दिवशी सरळ स्टेजवर कार्यक्रम घेण्यास प्रवृत्त केले व जनता विद्यालय ताडाळी येथील सांस्कृतिक कार्यक्रमा संमोहन स्टेज शो सादरीकरण करून प्रत्येकांनी चार-पाच व्यक्तीला संमोहनात नेऊन स्टेज वरती मनोरंजनात्मक कार्यक्रम प्रात्यक्षिकपणे सादर केले. या गोष्टीचा त्या प्रशिक्षणार्थ्यांना आश्चर्य वाटले. त्याचबरोबर कठीण -अवघड समजली जाणारी संमोहन प्रक्रिया तीन दिवसातच आत्मसात केल्याचे आनंद त्यांच्यामध्ये दिसून आला. पुणे -मुंबईच्या मानाने त्या दर्जाचा अभिनव उपक्रम व कार्यशाळा चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांमधून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांमध्ये ऍडव्होकेट. अंजली गुंडावार, पुष्पा गिरकर, सुवर्णा रामटेके (रेखीतज्ञ), मुख्याध्यापक बंडू जी नगराळे आदींचा सहित १८ विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला. संमोहन प्रक्रिया कार्यशाळेला सर्व स्तरावरून उत्तम प्रतिसाद लाभला.