
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी शेतकरी संघटना आयोजित शरद जोशी यांची जयंती साजरी होणार असून, त्या जयंतीनिमित्त कॉटन मॅन ऑफ इंडिया चारुदत्त मायी यांचा सत्कार यवतमाळ वाशिम चे खासदार संजय देशमुख यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमासाठी यवतमाळचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांची विशेष उपस्थिती राहणार असून, कार्यक्रमांमध्ये तंत्रज्ञानावर आधारित कार्यक्रम होत असून त्यामध्ये एचटीबीटीच्या टेस्टिंग बद्दलची माहिती व प्रात्यक्षिक महिको कंपनी जालना मार्फत देण्यात येणार आहे. ए आय निर्मित रियल टाईम डाटा शेतकऱ्यांना घरी कसा मिळणार याबाबतची उपकरणाची माहिती उपकरणाचे प्रात्यक्षिक दाखवणार असून. हा प्रोग्राम शेतकरी संघटनेच्या तंत्रज्ञान आणि कृषी विस्तार आघाडी मिलिंद दामले यांनी रेखांकित केला असून. कार्यक्रमाची वेळ दु. 12-30 असून त्यामध्ये शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल धनवट, महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रज्ञाताई बापट, मिलिंद दामले, विजय निवल, हजर राहणार असून यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे कार्यक्रमाचे स्थळ राम मंदिर तूप टाकळी ता. डिग्रस येथे असून सर्वांनी या प्रात्यक्षिक कार्यक्रमा साठी हजर राहावे अशी विनंती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र झोटिंग आणि देवेंद्र राऊत, दीपक आनंदवार, सोनाली मरगडे, अक्षय महाजन, यांनी केली आहे.
