शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे दिवाळीपूर्वी पगार करण्यासाठी विमाशीच्या पदाधिकाऱ्यांनी दिले निवेदन.

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनींचे आक्टोबंर पेड ईन नोव्हेंबरचे पगार दिवाळीपूर्वी म्हणजे 20आक्टोंबर पर्यंत करण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ यवतमाळ जिल्हा यांच्या वतीने 30/9/2022रोज शुक्रवारला माध्यमिक शिक्षणाधिकारी राऊत मॅडम यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.निवेदन देते वेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अशफाक खान सर, प्रांतिक उपाध्यक्ष अरविंद देशमुख, विभागीय कार्यवाह मुरलीधर धनरे सर, यवतमाळ जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जिवतोडे सर, जिल्हा कार्याध्यक्ष विजय खरोडे सर,मनोज जिरापूरे सर, जिल्हा उपाध्यक्ष पवन बन सर, विलास वाघमारे सर,सिर्तावार सर, प्राचार्य खैरे सर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.अशी माहिती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्रावनसिंग वडते सर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.