
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दि.31/8/023 अखिल भारतीय महिला संरक्षण संस्था व नशा बंदी मंडळ जिल्हा यवतमाळ , महिला विकास आर्थीक महामंडळ यवतमाळ,व नवक्रांती लोकसंचालीत साधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने, भारतीय पर्व रक्षा बंधनच्या कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.ह्या कार्यक्रमाच्या वेळी पोलीस स्टेशन राळेगाव व पत्रकार बंधु, सामाजिक कार्यकर्ते ह्यांना आमंत्रण देउन एकाच जागी हा कार्यक्रम उत्साहात घेण्यात आला.ह्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राळेगाव पोलीस निरीक्षक रामचंद्रजी प.जाधव,पीएसआय मोहन पाटील,युवराजजी पाईकराव,गणेश हुलके,जमादार गोपाल वास्टर,अनंता इरपाते,विशाल कोवे,रत्नपाळ मोहाळे,ईतर ही पोलीस वर्ग उपस्थित होते.तसेच पत्रकार वर्गातुन,महेश शेंडे,प्रकाश मेहता,राजु,रोहनकर, मनोहर बोभाटे, राष्ट्रपाल भोंगारे, महेश भोयर तसेच सामजिक कार्यकर्ते बाळु धुमाळ,गोपाल मश्रु होते.ह्या सोबतच तहसीलदार कुमरे साहेब यांना ही व्यसनमुक्तीची राखी बांधण्यात आली तसेच व्यसन मुक्तीचा संकल्प घेण्यात आला.ह्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित सौ.प्रनालीताई धुमाळ,कु.गौरीताई वर्मा,अॅड.रोशनीताई वानोडे/कामडी,सौ.,संतोषीताई वर्मा तसेच बचत गटांच्या महीलांची ही उपस्थिती होती.सौ.ॠशालीताई डाकोरे,श्रीमती.सुनिताई उईके,सौ.कांचनताई येपारी,सौ.मेश्रामताई..कार्यक्रमाचे आयोजन सौ.संतोषीताई वर्मा,अॅड रौशनीताई वानोडे /कामडी ह्यांनी केले .आभार सौ.प्रणालीताई धुमाळ ह्यांनी केले.बचत गटाच्या महिलांनी ह्या कार्यक्रमाला सहकार्य केले.
