
खैरी गाव तसं चांगलं पण पुढाऱ्यांनी व वेशीला टांगलं
(सरकारी दवाखाना आहे पण डॉक्टर नाही) (ग्रामस्वच्छता नावालाच)
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव (ग्रामीण) जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निर्मितीपासूनच जिल्हा व तालुक्याच्या राजकारणात खैरी हे गाव अग्रेसर असेच आहे. जिल्ह्यात खैरी गावाला मानबिंदू आहे परंतु नेतृत्व व नेतेच्या मानाने खैरी हे गाव विकास कामापासून मात्र कोसो दूरच आहे. परिसरातील लहान खेडेगावातील ग्रामपंचायत विकास कामामुळे मानांक मिळून पुढे जात आहे. मात्र येथील पुढाऱ्यांना गावाचे मानांकन मिळवण्यापेक्षा आमदार, खासदार, अध्यक्ष यांच्या पाठीमागे पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून फिरण्यात धन्यता मानताना दिसतात. गाव विकासात मात्र कुठेच अग्रेसर दिसत नाही. फक्त पक्षभेद मतभेद ह्या कामात खुटी घाल त्या कामात खुटी घाल हा याच्यातच राजकीय पुढारी अग्रेसर दिसते या पक्षाचा तो त्या पक्षाचा यातच धन्यता मानतांना दिसतात. मात्र गावाच्या विकासाबाबतीत एकांच्याही मनात गाव विकासापासून कोस दूर आहे याचा खेद व्यक्त होत नाही ही या गावाची शोकांतिका आहे.
राळेगाव तालुक्यात सर्वात मोठे गाव असलेल्या खैरी येथे वैद्यकीय व पशुवैद्यकीय असे दोन दवाखाने आहेत परंतु दवाखान्यात डॉक्टरच आता पशुवैद्यकीय दवाखान्याला डॉक्टर मिळाले तसे कळते. याकडे कुण्याही पक्षाचे नेत्याचे लक्ष नाही. वैद्यकीय दवाखान्या साठी दिलेल्या शेतावर दुसऱ्याने कब्जा केला त्यातही इथले नेते मंडळी राजकारण करीत आहे. आठवडी भरणाऱ्या बाजाराच्या जागेवर अतिक्रमण होऊन बाजाराला जागा कमी पडते त्याकडे येथील प्रशासनाचे दुर्लक्ष होतं आहे. वास्तविक आठवणी बाजाराच्या जागेचा सातबारा ग्रामपंचायत प्रशासनाकडे आहे पण पुढाऱ्यांच्या जवळच्या लोकांचे त्या जागेवर अतिक्रमण असल्यामुळे सर्वच चुप्पी साधून बसले आहे. मात्र या चूप्पीमुळे आठवडी बाजार दुसरीकडे जातो की काय हे सांगणे कठीण आहे. मात्र यामुळे गावकऱ्यांचे व गावातील आवश्यक यांचे नुकसान होणार हे कोणीही लक्षात घेत नाही ही खेदाची बाब आहे.
पूर्वी गावात जाण्यासाठी मोठे रस्ते होते आता मात्र एक लहान वाहन गावात नेताना त्रास होतो ही वास्तविकता आहे. एवढे अतिक्रमण रस्त्याच्या दुतर्फा वाढले आहे. अतिक्रमण हटविण्याची प्रशासनात हिंमत नाही कारण अतिक्रमणधारक े या पुढार्यांचे हितचिंतक आहे. त्यामुळे अतिक्रमण काढायला प्रशासन धजवतोय. विजेच्या लपंडावाने खैरीवासी त्रस्त होते मात्र सध्या वीजपुरवठा काही प्रमाणात का होईना सुरळीत सुरू आहे. परंतु लाईनचे येणे जाणे सतत सुरू असते. या बाबीकडे येथील पुढाऱ्यांचे दुर्लक्ष आहे.
गावात पाणीपुरवठ्याची एकच विहीर आहे त्या विहिरीवर जायला धड रस्ता नाही याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे पूर्वीपासून दुर्लक्ष होत आहे. पाणी पुरवठ्याचे नियोजन व्यवस्थित नाही . ग्रामपंचायतच्याच पाणीपुरवठा योजनेमुळे खैरी वडकी पांदण रस्ता बेकार झाला त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या शेतकऱ्यांना कमालीची कसरत करावी लागते व हायला पेस्ट घालाव्या लागतात याकडे ग्रामपंचायतचे लक्ष नाही. पावसाळ्यापूर्वी पांदण रस्त्याची करावयाची दुरुस्ती पावसाळ्या गेल्यानंतर करते हे मात्र नवलच!नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली म्हणून 2018 पासून गाजावाजा होत आहे. पाणीपुरवठा योजना मंजूर केल्याचे शुभेच्छा फलक ही मागे लागले होते. परंतु आज पावतो ह्या योजनेचे साधे भूमिपूजन सुद्धा झाले गावात जलजीवन मिशन योजनेचा अंतर्गत पाण्याची टाकी सुद्धा बांधण्यात आली तिचेही काम पूर्ण व्हायचे आहे.त्यामुळे ही योजना पूर्ण होणार की नाही यात शंकाच आहे. जलजीवन मिशनच्या योजनेसाठी गावातील सिमेंट रस्ते फोडून नाल्या करून पाणी टाकण्यात आले ते असेच कोणती वाळू न टाकता माती गोट्याने बुजविण्यात आली त्यातील किती पाई फुटले हे सांगता येत नाही. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत वर्धा नदीवर पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे जवळपास दोन वर्षे झाले पण पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण होऊनच नाही राहिले हे न उलमगडणारे कोडे आहे! मात्र योजना मंजुरीचे श्रेय घेण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे नेते व कार्यकर्ते मात्र कायम उतावीळ दिसतात. अडीच ते तीन वर्षे झाले जवळपास चारच वर्षे झाले पण जल जीवन मिशनचे काम मात्र पूर्ण झाले नाहीये. खैरी गावात उच्च दर्जाच्या जिल्हा परिषद शाळा आहे परंतु शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी साठी शौचालय व स्वच्छता गृह नाही शाळा व्यवस्थापन समिती याची मागणी ग्रामपंचायत करून शेवटी थकून गेली. आता तरी शालेय विद्यार्थ्यांच्या भौतिक दृष्टिकोनातून जिल्हा परिषद प्राथमिक उच्च केंद्र शाळा क्रमांक दोन मध्ये स्वच्छालय व स्वच्छतागृह बांधून मिळणार काय या प्रतीक्षेत शालेय विद्यार्थी आहेत.
ग्रामस्वच्छतेच्या बाबतीत तर विचारच नको जिकडे पाहावे तिकडे चारही बाजूने घाणीचे साम्राज्य आहे कचरा आहे झाडझुडपे आहे. पंचायत समिती व ग्रामपंचायत प्रशासनाने एकाच ठिकाणी तीन तीन स्वच्छतागृह बांधून एक विक्रमच केला. मात्र या स्वच्छतागृहाचे आजूबाजूला नेहमी कचरा व घाणीचे साम्राज्य पाहायला मिळतात. याच ठिकाणी आता बस स्थानकाचे काम करण्यात आले तेव्हा ते तरी व्यवस्थित राहील की नाही यातही शंकाच आहे? ग्रामस्वच्छतेचा बाबतीत तर विचार करूच नये गावात घंटागाडी आहे पण ती कधी गावातून घाण कचरा नेताना दिसतच नाही मात्र गावांमधील एखाद्या कार्यक्रमाची दवंडी देण्यासाठी ह्या घंटागाडीचा वापर होतो हे विशेष! यावरून खैरी गावाचा बोजवारा काढता येतो. ग्रामपंचायत प्रशासन कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नियोजन नाही (एखादा अपवाद वगळता) एक से बढकर एक कर्मचारी येथील ग्रामपंचायत मध्ये दिसतात.
यावरूनच खैरी येते सर्वच पक्षाचा बोलबाला असून येथे सर्वच पक्षाचे पुढारी आहे व या आधीही होते. त्याआधी पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य अशी पदे येथील पुढाऱ्यांनी भोगली आहे. मोठमोठे नेत्यांचे पूर्वीच्या काळीच्या वसंतराव नाईक सारख्या नेत्याची सुद्धा या गावाची जवळीक होती मात्र येथील अनेक योजना कामे इतरत्र हलविली गेली त्यामुळे ह्या गावाचा विकास होऊ शकला नाही. गावात एवढे मोठे पुढारी आहेत की त्यांनी मनावर जर घेतले असते तर विकासात्मक कामात खैरी गाव अग्रेसर असते परंतु तसे झाले नाही व विकासापासून खैरी हे गाव दूरच राहिले. या पक्षाचा सरपंच आहे त्या पक्षाचा आमदार आहे या राजकारणातच खैरी गाव विकासापासून कोसो दूर आहे परंतु गावाच्या विकासासाठी गावातील सर्व पक्षी राजकीय एकत्रित येताना दिसत नाही ही या गावाची शोकांतिका आहे ?येथील लोक खूप चांगले आहेत परंतु वैचारिक दृष्टिकोन साधून व पुढाऱ्यात व आपल्यात मतभेद होऊ नये यासाठी पुढाऱ्यांना प्रश्न विचारताना धजवतात. आता गावात नवीन तरुण सरपंच आहे यांच्याकडून तरी गावात काही सुधारणा होईल अशी गावकऱ्यांची अपेक्षा होती परंतु येरे माझ्या मागल्या सारखेच चित्र दिसते. दलित वस्तीची काही कामे , आदिवासी भवन सोडली तर खैरी हे गाव विकासात्मक विकासात्मक दृष्ट्या मागे पडले आहे . आता पुढे निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत असून सगळेच पुढारी तसेच काही हाफ लीडर प्रचारात व्यस्त असताना दिसतात पण विकासात्मक काम करण्यास कोणीही पुढे येताना दिसत नाही. सध्या खैरी येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून जयश्री पाटील मॅडम ह्या रुजू झाले आहे व त्या कामात अग्रेसर आहे आता त्यातही खैरी गावाचा विकास कसा करतात की गावातील राजकीय पुढाऱ्यापुढे हतबल होतात याकडे खैरी ग्राम वर्षाचे लक्ष लागले आहे. परंतु खैरी हे गाव तसं चांगलं पण पुढाऱ्यामुळे वेशीला टांगलं म्हणण्याची वेळ आजच्या तरुण पिढीवर आली आहे. पुढार्यांनो कुठे नेऊन ठेवलं घरी गाव अशी गावात ओरडत आहे.खैरी गावाचा विकास होणार की राजकारणा पाई खैरी गाव मागे राहणार हा येणारा काळ सांगेल.
