
वरोरा येथील एका महिला फार्मासिस्ट चा विनयभंगप्रकरणी शुभम गवई अटक करून जामिनावर सुटका करण्यात आली.
दिनांक 5 सप्टेंबर ला रात्रीच्या सुमारास वरोरा येथील विनायक ले आऊट मध्ये असलेल्या सोनवणे यांच्या मेडिकल मध्ये औषधी घेण्याच्या बहाण्याने जात मेडिकल मध्ये असलेल्या महिला फार्मासिस्ट ला जास्त पॉवर च्या गोळ्या दे ,चेहऱ्यावर असलेले डाग दाखवत त्यासाठी गोळ्या दे अशी मागणी केली ,डॉक्टरांच्या चिट्ठी शिवाय आम्ही गोळ्या देत नाही असे महिला फार्मासिस्ट ने सांगितले.
माझ्याशी मैत्री कर ,मी इथेच राहतो , आपण भेटू सर्व मुली माझ्या मैत्रिणी आहेत .तसेच मी एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे माझे कोणीच काही बिगडवू शकत नाही अशी धमकीही त्याने दिली.
त्या महिला फार्मासिस्ट सोबत ओळख काढत अश्लील हातवारे करीत महिलेचा विनयभंग केल्याने फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 6 सप्टेंबर 12.49 ला कलम 354 ,354( ड) नुसार वरोरा पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली .दिनांक 6 सप्टेंबर ला दुपारी 2.40मिनिटांनी आरोपीला कारवाई साठी ताब्यात घेण्यात आले .त्यांनंतर आरोपी ची जामिनावर सुटका करण्यात आली.
शुभम गवई हा भीम आर्मी चा जिल्हा उपाध्यक्ष पदावर कार्यरत होता .संघटनात्मक शिस्त भंग केल्याने 22 ऑगस्ट रोजी हकालपट्टी केली होती.
