मालवीय वॉर्ड येथील सरेशन चे धान्य वाटपात अनियमितता,कार्ड धारकांची तक्रार

परवाना रद्द करून दुसऱ्या बचत गटाला द्या

दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना अन्नधान्य स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी शासनातर्फे स्वस्त धान्य दुकाने चालविण्यात येते.बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाने स्वस्त दरात दुकाने बचत गटांना चालविण्यासाठी दिलेले आहे.असे असताना देखील काही ठिकाणी बचत गटाचे कोणतेही सदस्य स्वस्त धान्य दुकान न चालवता कोणतीतरी दुसराच चालक असल्याचे दिसून येते.असाच प्रकार वरोरा शहरातील मालवीय वॉर्ड वरोरा येथे सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.

      

वरोरा शहरातील मालवीय वॉर्ड येथील स्वस्त धान्य दुकान संगम महिला बचत गट यांना 2017 पासून चालविण्यासाठी परवाना देण्यात आला आहे. परंतु स्वस्त धान्य दुकान बचत गटातील कुठलीही सदस्य चालवत नसून मालवीय वॉर्ड येथील देवडे नामक व्यक्ती मार्फत चालवीत आहे.शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दर आकारून धान्य विक्री केली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.तसेच ग्राहकांना रेशन ची पावती दिली जात नाही , एकाच वेळेस दोन महिन्याचे थंब लावून धान्याची उचल करणे ,रात्री उशिरापर्यंत लाईन मध्ये उभे राहणे यासारख्या समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत.या सर्व समस्यांना घेत नागरिकांनी तहसील कार्यालय वरोरा येथे 20 डिसेंबर 2022 प्रभागातील नागरिकांनी तहसीलदार यांना निवेदन दिले असता फूड इन्सपेक्टर चौधरी यांनी 23 डिसेंबर रोजी लेखी जबाब नोंदविण्यात आले.स्वस्त धान्य दुकान ग्राहकांनी देवडे व संगम महिला बचत गट यांच्या विरोधात पुराव्यानिशी तक्रार केली त्यानुसार संगम महिला बचत गटावर प्रतिबंध लादून नवीन बचत गटाला स्वस्त धान्य दुकान चालविण्यासाठी देण्याची मागणी प्रभागातील नागरिकानी केली.