स्वातंत्र्य दिनानिमित्ताने नंदिनी नदी वाचवण्यासाठी मोहीम

नंदिनी वाचवा पर्यावरण वाचवा
आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य सादत निसर्गसेवक युवा मंच तर्फे नंदिनी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी म्हसोबा महाराज मंदिर येथे प्रबोधन कार्यक्रम करण्यात आला,विविध घोषणांचे फलक हाती धरून कार्यकर्त्यांनी जनते मध्ये प्रबोधनाचे काम केले यावेळी श्री सतीश काका कुलकर्णी, श्री सुरेशजी शिरोडे,श्री रोहित पारख, सौ. योगिता कुमावत, सौ.मेदने,सौ. अनुजा कुलकर्णी, सौ. हर्षाला कुवर, सुमित शर्मा आदी उपस्थित होते.