दिघी येथील मयताच्या कुटुंबाचे आमदार जवळगावकरांनी केले सांत्वन


हिमायतनगर तालुका प्रतिनिधी : प्रशांत राहुलवाड


हिमायतनगर – तालुक्यातील मौजे दिघी येथील जेष्ठ नागरिक भाग्यरताबाई दत्ता गायकवाड यांचे दि 10 मार्च रोजी दुःखद निधन झाले. त्या दिघी च्या सरपंच सौ. छाया बंडू गायकवाड यांच्या सासूबाई होत्या तसेच सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार गंगाधर गणपत गायकवाड यांच्या काकू होत्या.भाग्यरताबाई यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळल्याने हदगांव हिमायतनगर विधानसभेचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी हळहळ व्यक्त करून गायकवाड परिवाराचे दि 12 मार्च रोजी सांत्वन केले.
यावेळी बोलताना आमदार जवळगावकर म्हणाले कि भाग्यरताबाई यांच्या जाण्याने गायकवाड परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्यांच्या जाण्याने मलाही दुःख झाले आहे.यामुळे गायकवाड कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. असे ते या वेळी म्हणाले. यावेळी ग्रामसेवक गोनेकर मॅडम,सरपंच सौ. छाया बंडू गायकवाड,ग्रामपंचायत सदस्य संजय घुटे, संभाजी शिरफुले, बालाजी वानखेडे, सुनिल वानखेडे, अशोक शिरफुले, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार गंगाधर गणपत गायकवाड, बंडू गायकवाड,रवि गाडेकर यांच्यासह आदीजण उपस्थित होते.