वडकी येथील अक्षा पेट्रोलपंप जवळ भीषण अपघात; एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी


सहसंपादक : रामभाऊ भोयर


नागपूर हेद्राबाद नॅशनल क्रमांक ४४ वरील वडकी येथील अक्षा पेट्रोलपंप जवळ येरला येथील घनश्याम झिले वय ५२ वर्ष तर उत्कर्ष पारधी वय २५ वर्ष हे दोघेही वडकी वरून येरला येथे जात असतांना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जब्बर धडक दिल्याने घनश्याम झिले हे जागीच ठार झाले तर उत्कर्ष पारधी हा गंभीर जखमी झाल्याची घटना दिं २ सप्टेंबर २०२४ रोज सोमवारला दुपारी एक वाजता घडली आहे .
हिंगणघाट तालुक्यातील येरला येथील घनश्याम झीले व उत्कर्ष पारधी हे दोघेजण वडकी येथे काही पोळ्याच्या सणानिमित्त वडकी येथे खरेदी करायला गेले होते त्यानंतर दुपारी आपले काम आटोपून वडकी येथे दुचाकी क्रमांक एम एच ३२ एम ४२५१ या क्रमांकाच्या दुचाकीने येरला येथे गावी जात असताना वडकी येथील लक्षा पेट्रोल पंप समोर अज्ञात वाहण्याने या दुचाकीला जब्बर धडक दिली असता घनश्याम झिले हे जागीच ठार झाले तर उत्कर्ष पारधी हा गंभीर जखमी झाला आहे त्याला उपचारार्थ ग्रामीण रुग्णालय वडनेर येथे पाठविण्यात आले असून त्या घटनेची माहिती वडकी पोलीस स्टेशनला मिळताच ठाणेदार सुखदेव भोरखडे जमदार शंकरराव राजगडकर विनोद नागरगोजे सर्व पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले व वाहतूक सुरळीत केली असून पुढील तपास वडकी पोलीस करीत आहे.