जेवली येथे निकृष्ट दर्जाचा खतसाठा जप्त


प्रतिनिधी::प्रवीण जोशी
यवतमाळ.


खरीप हंगाम अगदी जवळ येऊन ठेपला हा दृष्टिकोन बघून शेतकऱ्यांनी बी बियाणे व खत शेतामध्ये नेऊन ठेवण्यास सुरुवात केली नंतर अनेक अडचणींना सामोरे जावे लागते चिखल असलेल्या वहीवाटा यामुळे शेतकरी आतापासून शेतात असलेल्या आखाड्यावर शेती उपयोगी खते नेऊन ठेवतात दुष्काळ नापिकी यामुळे कोरडवाहू स्वरूपातील उत्पादन करणारे शेतकरी आर्थिक दृष्ट्या हवालदिल झाल्यामुळे कमी भाव असलेले उत्कृष्ट पद्धतीचे खत असे सांगून शेतकऱ्यांच्या माथी मारताना काही महाभाग बंदी भागात कार्यरत असल्याची कुन कून कृषी विभागाला लागल्यामुळे सदर निकृष्ट दर्जाच्या खत साठ्यावर वर कारवाई करण्यात आली.

मौजा जेवली येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कृषी विभागाने एकत्रित कारवाई करत दर्जाहीन व शेती पिकाला अपायकारक असलेले २९८ पोते असलेला खताचा साठा जप्त केला या कारवाईमुळे येणाऱ्या काळात बोगस खत विक्री करणाऱ्यावर आळा बसेल ही बोगस खताची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शासकीय अधिकारी हरकतीत आले त्यामध्ये कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद आर. व्ही. माळोदे पंचायत समिती कृषी अधिकारी अतुल कुमार कदम तसेच जिल्हा गुणवत्ता नियंत्रण के. एस. पाटील यांनी गोडाऊन वर छापा टाकला व त्यांना ऍग्रो फोर्स रत्ना डीएपी दुय्यम व निकृष्ट खताच्या बॅग आढळून आल्या कोणत्याही बाबतीचा विक्री परवाना नसताना खत विक्री केली जात आहे असे निदर्शनास आले असून जप्त केलेला माल बिटरगाव पोलीस स्टेशन येथे आणण्यात आला. व दरम्यान जप्त केले ते दुकान संतोष दळवी यांचे असून त्यांनी ती संकेत इंगोले बिटरगाव यांना भाड्याने दिले होते वृत्तलिहीपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते सदर कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले की कृषी निविष्ठा घेत असताना पक्की रशीद घेऊन माल खरेदी करावा