खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक संजयभाऊ जुमडे यांचा वाढदिवस केक कापून व शाल श्रीफळ देऊन साजरा

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक श्री संजयभाऊ जुमडे यांचा वाढदिवस खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष श्रीमान मिलिंदभाऊ इंगोले यांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला.त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री राजेंद्रभाऊ तेलंगे यांच्या हस्ते संजयभाऊ जुमडे यांचा शाल व श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी संस्थेचे संचालक श्रावनसिंगजी वडते सर, मध्यवती सहकारी बँक संचालिका तथा पांढरकवडा विभागाच्या अध्यक्षा सौ वर्षाताई राजेंद्रभाऊ तेलंगे, सौ इंगोले, व कर्मचारी गणेशजी हिवरकर,सचिनजी बोरकर, किरणजी गाडगे, अवधूतजी शेराम, पंकजजी दरवरकर ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.त्यांनी सुद्धा संजयभाऊ जुमडे यांना केक भरवून शुभेच्छा दिल्या.