
[आ. अशोक उईके, जिल्हाधिकारी पंकज आशिया, सुधीर जवादे यांची उपस्थिती ]
राळेगाव येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालय येथे 25 सप्टें. रोजी पाणी वापर आढावा सभा व एकदिवशीय कार्यशाळा घेण्यात आली.
बेंबळा पाटबंधारे विभाग, व ज्ञानसाधना शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यशाळेचे अध्यक्ष आ.प्रा. डॉ. अशोक उइके, प्रमुख पाहुणे पंकज आशिया जिल्हाधिकारी,अध्यक्ष बेंबळा संघर्ष समिती सुधीर जवादे, प्रगतीशील शेतकरी बाबासाहेब दरणे,गु.ल.राठोड कार्यकारी अभियंता, अमित भोईटे तहसीलदार, अमोल जोशी तालुका कृषी अधिकारी, प्रियंका पाटील अध्यक्षा ज्ञानसाधना शिक्षण संस्था, मनिष भानवे सचिव, मनोज पवार प्रकल्प अधिकारी पाणी वापर संस्था, तसेच पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
संचालक व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार अशोक उइके, पंकज आशिया जिल्हाधिकारी, यांनी पाणी वापर संस्थेच्या पदधिकारी व संचालक संवाद साधला, तसेच जलसंपदा विभाग, बेंबळा नदी प्रकल्प अंतर्गत पाणी वापर संस्थेच्या पदधिकारी व संचालक व शेतकरी यांना गु.ल. राठोड कार्यकारी
अभियंता तसेच कृषी विभागाचे पिकेव्ही वाल्मी चे अधिकारी यांनी पाणी वापर संस्थेच्या पदधिकारी, संचालक, शेतकऱ्यांना पाणी वापराबाबत मार्गदर्शन केले,
आ. प्रा. डॉ अशोक उईके यांनी बेंबळा हा महत्वाकांक्षी सिंचन प्रकल्प आहे. यातील समस्या तातडीने दूर करण्यात येईल. त्या साठी प्रशासनाला कार्यप्रवण करू अशी ग्वाही दिली. बेंबळा संघर्ष समिती चे अध्यक्ष सुधीर जवादे यांनी शेतकऱ्यांच्या मनातील प्रश्न उपस्थित केले. जेष्ठ प्रगतीशील शेतकरी बाबासाहेब दरणे यांनी कालवे व इतर बाबींवर प्रकाश टाकला त्यांनी बेंबळा बाबत च्या प्रश्नवर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.ईतर डॉ. तंज्ञानी मार्गदर्शन केले. या कार्यक्रम यशस्वीतेकरीता पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष, सचिव तसेच सर्व पदाधिकारी यांनी सहकार्य केले.
प्रतिक्रिया
आपल्याकडे सिंचन जागृतीचा प्रचंड अभाव आहे. बेंबळाचे पाणी योग्य रीत्या मिळाले तर फार मोठी क्रांती विधानसभा मतदार संघात होऊ शकते. मुख्य कालव्याच्या बाजूचे डांबरीकरन व उपमुख्य कालव्याच्या बाजूने विद्युत्तीकरण करण्याची नितांत गरज आहे. पश्चिम महाराष्ट्रात हे झाले.पाटसरे असेल तिथे इंजिन लावू शकतो पण केनल ची रचना तशी नाही,त्या साठी विद्युत्तीकरण खूप महत्वाचा विषय आहे.विकासाचा दृष्टीकोण तसा हवा.शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही, तंटामुक्ती च्या घोषणा आपण करतो पण मोबदल्या बाबत शासनच तंटे लावण्याचे काम करीत आहे.अनेक ठिकाणी कालव्याच कागदावर काम झालं पण प्रत्यक्षात नाही अस्तरीकरण झालं पाहिजे. केनल वर व जमिनी खाली त्या मुळे पाणी पाझरत असत . सिंचन कल्चर आपल्याकडे विकसित झालं पाहिजे.
सुधीर जवादे
अध्यक्ष बेंबळा संघर्ष समिती
