
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव येथील सर्वांचे सुपरीचीत गोविंद धोटे हे हाॅलिबॉल चे उत्कृष्ट खेळाडू,आपल्या आगळ्यावेगळ्या राहणीमानाने परिचित असून आज रोजी त्यांना उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून जिल्हा परिषद मुलांची शाळा राळेगाव येथे त्यांची वर्णी लागल्याने सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे, त्यांनी 1990 रोजी शिक्षक या अंतर्गत नोकरी घाटंजी पंचायत समिती अंतर्गत पारवा येथून आपली कारकीर्द सुरू केली, त्यानंतर 1993 मध्ये राळेगाव पंचायत समिती अंतर्गत वेडशी येथे आपल्या कार्यास सुरुवात केली व 1995 मध्ये सहाय्यक मुख्याध्यापक म्हणून रावेरी येथे त्यांनी आपली जबाबदारीची आगळी वेगळी छाप निर्माण करून आपली कारकीर्द पार पडली होती,तसेच मेंघापूर येथे सुद्धा आज रोजी विविध ठिकाणी आपले शैक्षणिक कार्य करीत असताना त्यांना राळेगाव येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा येथे उच्चश्रेणी मुख्याध्यापक म्हणून त्यांची वर्णी लागल्याने तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होताना दिसून येत असून मित्र मंडळींकडून कौतुक करण्यात येत आहे.
