चिखली बुद्धविहार येथे वर्षवास समाप्ती कार्यक्रम उत्साहात संपन्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

चिखली (वनोजा) येथे वर्षवास निमित्त महिलांनी नियमित 3महिने भगवान बुद्धांच्या धम्मग्रंथाचे वाचन करून पूजन करण्यात आले,त्यावेळी महिलांमध्ये खूप उत्साह दिसून आला,याप्रसंगी ग्राम पंचायत सदस्य लोकेश दिवे यांच्या पुढाकाराने महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी भगवान बुद्धांच्या प्रतिमेचे भेट देण्यात आले,यावेळी उपस्थित समाजबांधवांच्या मोठ्या उपस्थिती मध्ये कार्यक्रम पार पडला या वेळी उपस्थित महिला,सौ.कांचनताई घायवटे (पोलीस पाटील),विभाताई पुडके (तंटामुक्ती अध्यक्ष),जोत्स्नाताई वैरागडे,रुपालीताई सोनटक्के, कांताबाई वनकर मंदाबाई वनकर वनिताबाई फुलमाली कल्याणी पाटील व माता रमाई महिला मंडळ चा सर्व महिला उपस्थित होत्या ग्राम पंचायत सदस्य लोकेश दिवे यांनी असेच समाज उपयोगी कार्यक्रम गावात घ्यावे असा सूर सर्व महिला मंडळामधून निघत होता,कार्यक्रमाचे आभार कांचन ताई घायवटे यांनी केले