
दिवाळी सण आला की, शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्ट्या, मातीच्या रंगीबेरंगी पणत्या, झुमकेदार आकाशकंदील, रंगीत पोस्टर यांचे वेध लागते.
आपल्या घरासमोरील आकाशकंदील, पणत्या स्वतः बनवून लावल्या तर विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचा आनंद द्विगुणित होईल, या भावनेने विद्यार्थ्यांना शाळेतच पर्यावरणपूरक आकाशकंदील, मातीच्या रंगीबेरंगी पणत्या सजविणे, व रंगीत पोस्टर रंगविण्याचे प्रशिक्षण या उपक्रमाद्वारे देण्यात आले होते.
विद्यार्थ्यांनी फाइल बोर्ड पेपर, सेंच्युरी पेपर, कापडी रिबीन, रंगीत दोरा, काचेचे तुकडे, रंगीबेरगी कागदी फुले यांचा वापर करीत भरपूर असे पर्यावरणपूरक आकाश कंदील साकाराले, तसेच मातीच्या पणत्या व रंगीत पोस्टर यांना रंग दिले.
या उपक्रमात शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी उत्स्पूर्त सहभाग नोंदविला.
दिपावलीला आवश्यक असणारे आकाशकंदिल, रंगीबेरंगी पणत्या, रंगीत पोस्टर यांचे महत्त्व जाणून घेत त्याची पर्यावरणाशी सांगड घालण्याचा प्रयत्न या उपक्रमाद्वारे केला जात असल्याचे यावेळी विद्यार्थ्यांना शिक्षकांनी सांगितले.
यावेळी शाळेच्या प्राचार्या कु.मंजुषा दौलत सागर मॅडम तसेच सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे आकाश कंदील बनविणे किती सोपे असते, याचा अनुभव मिळाला. यापुढे त्यात अजून नाविन्यता आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.
असे विद्यार्थिनी सांगितले
दिवाळीत बाजारात मिळणाऱ्या प्लास्टिकपेक्षा आपल्या विद्यार्थ्यांनी साकारलेला आकाशकंदील घरासमोर लावल्याचा
अधिक आनंद होईल, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये कलेविषयी आदर वाढत आहे.
