
सहसंपादक -रामभाऊ भोयर
पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजाराचे अनुदान दिले जाते या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळत आहे मात्र नवीन शेतकऱ्यांचे नाव नोंदणी करण्यासाठी अडचण येत आहे शिवाय काहींनी नाव नोंदणी करूनही संबधित कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे त्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही त्यासाठी शेतकरी तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवतांना दिसून येत आहे.
केंद्र सरकार प्रमाणे राज्य सरकारनेही ६००० हजार रुपये किसान सन्मान योजनेत वाढ केल्याने केल्याने आता शेतकऱ्यांना केंद्र सरकारचे ६००० व राज्य सरकारचे ६००० हजार असे एकूण १२००० हजार रुपये मिळणार असल्याने शेतकरी व शेतकरी विधवा महिला सुद्धा किसान सन्मान योजनेचा लाभ मिळविण्यासाठी तहसील कार्यालयात चकरा मारताना दिसून येत आहे. येथील शेतकरी आपले नाव किसान सन्मान योजनेच्या यादीत आले किंवा नाही यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांकडे गेल्यानंतर येथील कर्मचारी ठीक आहे पाहून घेतो किंवा तुमचे नाव आमच्या कडे आले नाही तुम्ही तलाठ्याकडे जावून करून आना नाहीतर ज्या ठिकाणावरून तुम्ही ऑनलाईन केले तिथे जावून बघून या असे सांगितले जात. आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून अशा त्रासापोटी शेतकरी किसान सन्मान योजने पासून वंचित राहानार तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे तरी संबधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडे वेळीच लक्ष देवून कोणतेही शेतकरी सन्मान योजने पासून वंचित राहणार नाही याकडे लक्ष द्यावे अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. लागत आहे.
