
प्रतिनिधी:: प्रवीण जोशी
यवतमाळ
प्रत्येकच व्यक्ती आपले आयुष्य सुखी होण्यासाठी व कुटुंबाला लागणाऱ्या सर्व गरजा पूर्ण व्हाव्या म्हणून अहोरात्र कष्ट करून पैसे जोडत असतो. व ते कमाविलेले पैसे आपल्याला आयुष्याच्या संकटाच्या काळात कामी यावा असलेली गरज पूर्ण व्हावी यासाठी साठवणूक करून ठेवताना अनेकांना आपण बघितले आहे साहजिक पण आहे की ज्या ठिकाणी जास्त व्याजदर आहे अशा ठिकाणी गुंतवणूक करतो आणि इथेच सर्वसामान्य भोळा भाबड्या व्यक्तीची हमखास फसवणूक होण्याची दाट शक्यता असते म्हणून ज्या ठिकाणी भारतीय रिझर्व बँकेचे अधिकृत अधिपत्य असेल अशाच ठिकाणी सर्वसामान्यांनी सुद्धा गुंतवणूक करायला हवी आजकाल आपण बघतोच आहे की अनेक खासगी पतसंस्था आल्या आणि सर्वसामान्यांना बुडून पैसे खाऊन पळून गेले अशा महाठगांची संख्या काही कमी नाही.
ढाणकी शहरात सुद्धा बोगस पथसंस्थांचा अगदी सुळसुळाट झाला असून लोकांना अधिकच्या व्याजापोटी कधी फसवून करून रातोरात पोबारा करतील काहीच सांगता येत नाही अशी ठिकाणी ढाणकी शहरात सुद्धा फोफावताना दिसत आहेत. काही नेते की ज्यांना लोकांनी ओवाळून टाकले व निवडणूक कधीच जिंकता येणार नाही व आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी काहीनी सहकार क्षेत्र लुटून खाऊन आपला पोटाडेपणा व स्वतःचा मोठेपणा मिरवणाऱ्या नेत्यांनी सुद्धा यात प्रवेश केलेला आहे तर अनेक ठिकाणी विविध देवदेवतांचे व पवित्र अशा गंगेची नावे देऊन पथसंस्था उभ्या केलेल्या आहेत पण अशा पथसंस्था कधी पोबारा करतील काही सांगता येत नाही ज्या शहरात किंवा खेडेगावात या पथसंस्थांनी बस्तान बसविले त्या शहरातील नेत्यांना त्या ठिकाणी पदसिद्ध संचालक किंवा मोठेपणाचे स्थान देऊन आपली दुकानदारी सुरू करतात पण सर्वसामान्य व्यक्तीला धूर्त राजकारणाची खेळी ओळखता येत नाही लोकांचा विश्वास बसावा यासाठी लोकांनी टाकून दिलेल्या राजकारणाची नियुक्ती केल्या जाते व हेच राजकारणी यात गुंतवणूक करा मी आहे अशी हमी देतात पण ज्यावेळी पैशाचा विषय येतो त्यावेळेस कोणीच कोणाचे नसते गुंतवणूक करा म्हणणारे नेते सुद्धा हात वर करून जबाबदारी झटकून मोकळे होतात ढाणकी शहरात सुद्धा असे भरोसा हमी अर्थातच विश्वास ठेवावे अशी खासगी गुंतवणूक असणारी ठिकाणे फारच कमी त्यामुळे सर्वसामान्यांनी भलेही व्याजदर कमी असले तरी चालेल पण रिझर्व बँकेचे अधिपत्य असेल त्याच ठिकाणी गुंतवणूक केल्यास अधिक फायदेशीर होईल तसेच या पथसंस्था सुद्धा विश्वास रहावा व लोकांनी गुंतवणूक करावी म्हणून गावातीलच तरुणांची कर्मचारी म्हणून नियुक्ती करतात व हे कर्मचारी सुद्धा लोकांना गुंतवणूक करताना हमी देतात आम्ही आहोत काळजी करू नका वास्तवात यांच्या हातात काही नसते यांना रकमेवर विशिष्ट असे भरघोस कमिशन असते ते सुद्धा लगेचच त्यांना मिळते पण पोबारा केला की भरडल्या जातो तो सर्वसामान्य व्यक्ती त्यामुळे ढाणकी शहरात भाऊ, दादा,ताई, वहिनी, काका, काकूंनी, विविध नावे देऊन दुकानदाऱ्या थाटल्या खऱ्या पण त्या कधी ही पोबारा करू शकतात. तेव्हा ढाणकी शहरातील जनतेने अधिकच्या व्याजदरापोटी व लालसा ठेवून केलेली गुंतवणूक कधी रफूचक्कर होईल सांगता येत नाही तेव्हा गुंतवणूक जास्त व्याजदर असेल त्या ठिकाणापेक्षा सुरक्षित ठिकाणी करावी भलेही व्याजदर कमी असेल पण हमी तरी असेल
