धानोरा जिल्हा परिषद शाळेमध्ये नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन निमित्त राखी निर्मिती स्पर्धा

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील धानोरा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे दि. 2 तारखेला नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन निमित्त राखी निर्मिती स्पर्धा घेण्यात आली, विध्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने धानोरा शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका रत्नमाला धुर्वे मॅडम, सदिप टुले सर, केदार मॅडम, चौधरी मॅडम, पेटकर मॅडम, यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता, अनेक मुलीनी टाकाऊ वस्तूंपासून राखी निर्मिती केली व शाळेतील मुलांना बांधुन त्या उपयोगी आनल्या ज्या मुलीनी टाकाऊ वस्तूंपासून चागली राखी निर्मिती केली त्या मुलीना शाळेतून पारितोषिक मिळणार असल्याचे सांगितले आहे.