
ढाणकी प्रतिनिधी -प्रवीण जोशी.
अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेले निंगनूर येथील पत्रकार मारुती गव्हाळे वय 30 वर्ष यांचे काल दुःखद निधन झाले.
अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे मारुती हे आदिवासी बांधवांच्या गळ्यातली ताईत होते. आपल्या लेखणीच्या माध्यमातून ते नेहमी सामाजिक प्रश्न मांडत आले. काल काही कामानिमित्त ते उमरखेडला गेले असता दगड थर मार्गे निंगनूर येत असताना चिल्ली जवळ त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांची प्राणज्योत मावळली. ते प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे सक्रिय सदस्य होते तसेच त्यांनी संघटनेत विविध उच्च पद भूषवली होती. त्यांच्या अशा अकाली जाण्याने संघटनेचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, तीन महिन्याचे लहान मुलगी, व असा मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्यावर आज निघणार येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातील नेतेमंडळी, पत्रकार, समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
