जि.प.प्रा. शाळा दिघी येथील अध्यापक बी.जी. कळसे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार

सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार गंगाधर गायकवाड दिघीकर यांनी शाल श्रीफळ देऊन केला सत्कार …

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड

मराठवाड्यातील सर्व शहीद हुतात्म्यांच्या बलिदाना मुळे आपल्याला मराठवाड्यात रहाण्याचे स्वतंत्र्य मिळाले आहे. म्हणून आज दिनांक १७ सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो, सर्व प्रथम शहीद हुतात्म्यांच्या प्रतिमेची पुजा व पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले आहे. त्यानंतर ध्वजारोहण करून राष्ट्रगीत म्हणले आहे. त्यानंतर हिमायतनगर तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा दिघी येथील अध्यापक तथा कवी बी.जी. कळसे सर यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार मा. गंगाधर गणपत गायकवाड दिघीकर यांनी बी.जी. कळसे सर यांच्या शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला आहे. यावेळी उपस्थित गावातील पोलिस पाटील विलासराव कदम, सरपंच सौ. छाया गायकवाड, शालेय समिती अध्यक्ष सुभाषराव तवर, विश्वासराव वानखेडे, शेषराव कदम, शिलवत सावते, आरुण सावते, शाळेचे मुख्याध्यापक माने सर, सुर्यवंशी सर, अशोक शिरफुले, सह आदी जणांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.