
ढाणकी ( प्रती)प्रवीण जोशी
आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी रविवारला बिटरगाव पोलीस स्टेशन तर्फे ढाणकी येथील पोलीस चौकीला शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली यावेळी या कार्यक्रमाला शहरातील अनेक प्रतिष्ठित व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. त्यामध्ये शेख झहीर उपाध्यक्ष ढाणकी नगरपंचायत, बाळासाहेब चंद्रे, आनंदराव चंद्रे ,प्रशांत जोशी, अनिल येरावार, खाजाभाई कुरेशी, नागेश महाजन, रुपेश कोडगीरवार, रामराव गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या सर्वच उपस्थित मान्यवरांनी आपले म्हणणे मांडताना सांगितले की कायद्याच्या चाकोरीत राहून अत्यंत आनंदाने व उत्साहाने येणारे नवरात्र उत्सव ईद-ए-मिलाद आणि इतर उत्सव सण साजरे करावे परंतु आपल्याकडून हे उत्सव साजरे करताना कोणतेही गालबोट लागणार नाही याची खबरदारी घ्यावी गेली दोन वर्ष कोरोनाच्या संकटामुळे आपण हे उत्सव साजरे करू शकलो नाही.
याची जाणीव आम्हाला असून आपल्या सर्वांच्या भावनांचा आ दर करतो. आपणही प्रशासनास मदत करावी असे आव्हान उपस्थित मान्यवरांनी केले. बिटरगाव पोलीस
स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक
प्रताप भोस म्हणाले सध्या सायबर चे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत असून याबाबत सर्वांनी सतर्क असायला पाहिजे कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची दक्षता घ्यावी. व्यसनाधीनता ही कुकर्माची जननी आहे. सन उत्सव जरूर साजरे करा पण त्याचा त्रास कोणालाही होता कामा नाही सर्व नियमांचे पालन करून सण साजरे व्हावे व तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे असे आव्हान कर्तव्यदक्ष ठाणेदार प्रताप भोस यांनी केले.
