हिंगणघाट पोलिसांवर येनोरा येथे पुन्हा एकदा गोळीबार


हिंगणघाट : येथील नंदोरी चौकात दोन अज्ञात गुंडांनी काल रात्री पोलिस जमादार श्री धोटे यांच्यावर गोळी चालवण्याचा प्रयत्न केला होता.सुदैवाने या गोळीबारात ते थोडक्यात बचावले. त्यानंतर पोलिसांद्वारे या गुंडांची शोध मोहीम सुरू असताना आज रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास हिंगणघाट पासून चार किलोमीटर अंतरावरील येनोरा या गावात दोन अज्ञात तरुण संशयास्पद स्थितीत फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस ,या गुंडांच्या शोधार्थ येणोरा गावात आले पोलिस दिसतात या गुंडांनी त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने नेम चुकल्याने यात कोणीही जखमी झालेले नाही. गुंडांनी दुचाकी तेथेच सोडून रस्त्याकडेला शेत शिवारातून पळ काढला.दोघेही एकमेकांच्या विरुद्ध दिशेने पळाले. 30 पोलिसांचे पथक घटनास्थळावर दाखल झाले असून गावकऱ्यांच्या सहकार्याने शोध मोहीम राबविली जात आहे.