शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

सहसंपादक : रामभाऊ भोयर

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त विविध उपक्रम राळेगाव शहरात राबविण्यात आले सकाळी सात वाजता शिवराज्याभिषेक दौड स्पर्धेचे आयोजित करण्यात आले होते यामध्ये प्रथमआदेश चव्हाण द्वितीयअनिल बघेल तृतीय मनोज पोहणे क्रमांक पटकाविला प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम आरुषी शेळके द्वितीय हेमंत रेघें भारतीय पवन देशमुख चतुर्थ राधा देशमुख यांनी क्रमांक प्राप्त केला…….. सायंकाळी पाच वाजता किंग ऑफ नागपूर श्रीमंत उद्धवजी राजे भोसले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्यांचा जलाभिषेक करण्यात आला याप्रसंगी राळेगाव शहरातील बारावी परीक्षेत तालुक्यातून प्रथम येणाऱ्या तनिषा सतीश डाखोरे दहावी परीक्षेत तालुक्यातील प्रथम आलेली जान्हवी गणेश ठाकरे द्वितीय आलेली श्रावणी दिनेश कोल्हे तसेच प्रत्येक शाळा महाविद्याल मधून प्रथम आलेले पलक मैसकर स्नेहा सोनटक्के आकांक्षा वाघ तन्मय पांडे नेहा मेलेकर अनुज कांबळे आचल दारवेकर नम्रता शिवरकर निकिता पों गडे यांचा छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती व साई वृद्धाश्रम राळेगाव च्या वतीने विद्यार्थी व पालकांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी व्यासपीठावर माजी खासदार भावनाताई गवळी आमदार डॉ अशोक उईके उपनगराध्यक्ष जानराव गिरी यांची उपस्थिती होती सायंकाळी नगर भोजनांचा कार्यक्रम ने कार्यक्रमाची सांगता झाली.