
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
मत्स्य व्यावसायिकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवार पासून कारंजा येथील तहसील कार्यालय समोर बेमुदत आमरण उपोषनाला सुरवात केली.कार नदी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था कारंजा घाडगे या संस्थेच्या नेतृत्वात आमरण उपोषण सुरू केले .सोमवारी तहसील कार्यालय समोर चालू असलेल्या आमरण उपोषणाची माहिती कळताच संभाजी ब्रिगेड चे नेते पियुष रेवतकर यांनी उपोषण स्थळी आपल्या कार्यकर्त्यांन सोबत जाऊन भेट दिली ,व उपोषणकर्त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या आणि संभाजी ब्रिगेड शाखा कारंजा घाडगे तर्फे उपोषणाला समर्थन दिले .जो पर्यंत मत्स्य व्यावसायिकांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर गाठ संभाजी ब्रिगेडशी आहे हे लक्षात ठेवा असा इशारा देखील पियुष रेवतकर यांनी या वेळी दिला .उपोषण चालू असल्याची माहिती कळताच लगेच दखल घेऊन ,मागण्या समजून संभाजी ब्रिगेड ने समर्थन दिले मात्र काँग्रेस ,भाजप ह्या दोन राष्ट्रीय पक्षाने उपोषणाची दखल सुद्धा घेतली नाही कारण यांना फक्त निवडणूक आली की जातीवादी राजकारण कळतं जनतेच्या काय समस्या आहे याचे काहीही लेन देणं यांना नाही असे मत देखील पियुष रेवतकर यांनी यावेळी नोंदविले.
