विद्युत तारेच्या स्पर्शाने तरुणाचा मृत्यू


सहसंपादक : रामभाऊ भोयर


राळेगाव वरून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या जळका येथील अनिल अंकुश आवारी या ३० वर्षीय तरुणाचा दिनांक २४ मे २०२४ शुक्रवारला सकाळी ७ :०० वाजताच्या सुमारास शेतात वीज प्रवाहित तारेचा स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की अनिल अंकुश आवारी हा सकाळी सात वाजताच्या सुमारास प्रातःविधीला बाहेर गेला होता परत येत असताना नथूजी सोनेकर यांच्या शेतात वीज प्रवाहित तार तुटून खाली लोंबकळत होती ती तार अनिल आवारी च्या लक्षात आली नाही दरम्यान जिवंत वीज तारेचा स्पर्श त्याच्या गळ्याला झाला दरम्यान तो अनिल खाली कोसळला ही बाब बाजूंच्या काही लोकांच्या लक्षात येतात त्यांनी घटनास्थळी धाव घेतली यातच अनिल चा मृत्यू झाला या तारेच्या स्पर्शाने काही दिवसापूर्वी बकरीचाही जीव गेला होता सोनेकर यांच्या शेतातील ही दुसरी घटना असून ते शेत सोनेकर यांनी मारुती कोळसे यांना मकत्याने दिले आहे. या शेतात चार-पाच दिवसाआधी कोळसे यांनी ट्रॅक्टरने शेतीची मशागत केली त्यावेळी ही तार अशीच लोमकळत असल्याचे सांगण्यात आले घटनास्थळावर वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आले असता त्यांनी या तारेबाबतची माहिती कळविली नसल्याचे समोर आले या तारेच्या स्पर्शामुळे ३० वर्षे अनिलचा मृत्यू झाला असून अनिलच्या पश्चात पत्नी चार वर्षीय मुलगी भाऊ व आई असा आप्त परिवार आहे या अनिलच्या अपघाती मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.