
सहसंपादक : रामभाऊ भोयर
गेल्या काही दिवसापासून चोरीच्या अफवांनी नागरिक हैराण असून त्यांच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे या चोरांच्या अफवेमुळे लोकांची झोपच उडाली आहे. तर काही गावात रात्र रात्र जागून गस्त घालण्याची वेळ राळेगाव तालुक्यातील नागरिकांवर आली आहे. त्याच झालं अस की काही दिवसापासून शहरासह गाव खेड्यातही रात्रीचे चोरीचे प्रमाण वाढल्याने नागरिक भयभीत झाले आहे.
त्यामुळे पंधरा दिवसापासून तालुक्यातील अनेक गावागावातील महिला मजूर शेतात काम करत असताना तसेच गावागावातही चौकाचौकात चोर आले का चोर असे एकमेकांना विचारत असून अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे तसेच हे चोर घरात शिरून गुंगीचे स्प्रे मारून चोरी करतात असतात अशी चर्चा सद्या सर्वत्र रंगत असून गावागावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या चोरांच्या भीतीने नागरिकांनी स्वतःच्या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी रात्रभर पहारा द्यायला सुरुवात केली असून रात्र रात्र जागून काढत असल्याचे तालुक्यातील काही गाव खेड्यात सांगितले जात आहे. काही ठिकाणी तर चोरटे लोकांना अडवून त्यांच्याजवळ पैसे लुटून मारून त्यांना हाकलून लावत असल्याची चर्चा सुद्धा करताना दिसून येत आहे तरी याकडे पोलीस प्रशासनाने त्वरित लक्ष देवून रात्रीच्यावेळी येणारे खरोखरच चोर आहे की गावगुंड चोर आहेत हे शोधणे पोलिसांना गरजेचे आहे.
