
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वरुड जहांगीर येथील बंजारा वस्तीला एक सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर दिले आहे तर पंपासाठी एक वेगळा ट्रान्सफॉर्मर दिला असून या सिंगलफेज ट्रान्सफॉर्मरवर बंजारा वस्तीतील घरगुती विद्युत पुरवठा आणि एक पीठ गिरणी चालत असून दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरवर शेतातील विहीरीवर पंप सुरू असून दोन्ही ट्रान्सफॉर्मरवर कामापेक्षा जास्त भार असल्याने नेहमीच हे ट्रान्सफॉर्मर जळून जातात आणि गावकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.अशातच या तांडा डीपीचे दोन्ही ट्रान्सफॉर्मर दोन तीन दिवसापासून बंद पडले असल्याने संपूर्ण गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला असून घरातील लाईट बंद पडले असून घरातील पाण्याच्या मोटारी बंद असल्याने मानसाचे जनावरांचे पाण्याचे हाल होत असून टेंपरेचर खूप आहे ,कुलर पंखे बंद असल्याने लहान मुलांना वयोवृद्ध व्यक्तींना आजारी लोकांना खूप त्रास सहन करावा लागत असून या बाबतीत ग्राम पातळीवर काम करणारे कर्मचारी कपिल नहाते यांना सांगितले असता त्यांनी मी वरीष्ठाना माहिती दिली असल्याचे सांगितले. अशातच शेतकऱ्यांना सुद्धा शेतातील लावलेली पिके, बागायती नष्ट होण्याची भिती वाटत असून अधिकाऱ्यांना कळविले असताना सुद्धा आज दिनांक 5/5/2025 पर्यंत कुठल्याही प्रकारचे ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले नसून यावरून निश्चितच लक्षात येते की सामान्य जनता, शेतकरी यांचा वाली ना संबंधित अधिकारी ना पदाधिकारी असल्याचे खरेदी विक्री संघाचे संचालक श्रावणसिंग वडते सर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
