
सहसंपादक : रामभाऊ भोयर
एस सी आणि एसटी समाज जर सोडला तर बहुतांश समाज ओबीसी आहेत आमच्या पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी जितकी ज्यांची संख्या तितके त्यांना आरक्षण असणार असा नारा दिला तसेच जात निहाय जनगणनेची सुद्धा त्यांनी मागणी केलीआहेत ओबीसींचे हित काँग्रेस पूर्वीपासूनच जपत आली आहेत आणि असेही जो पक्ष भविष्यात ओबीसींचा विचार करेल तोच पक्ष राज्यात व देशात राज्य करेल असे विचार काँग्रेस ओबीसी सेलचे राज्याचे अध्यक्ष भानुदास माळी यांनी यवतमाळ येथील कार्यक्रमात मांडले जिल्हा काँग्रेस ओबीसी विभाग द्वारा आयोजित जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा एम डब्ल्यू लॉन येथे घेण्यात आला यावेळी उद्घाटक म्हणून भानुदास माळी बोलत होते कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी मंत्री ऍड शिवाजीराव मोघे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री प्रा वसंत पुरके काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड प्रफुल्ल मानकर जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष इंजी अरविंद वाढोणकर तेलंगणाचे आमदार डॉ रेड्डी, बहादुर बाळासाहेब मांगुळकर विजय राऊत राजीव घुटे राजाभाऊ हाडोळे प्रदीप वादाफळे अरुण राऊत कृष्णा कडू जावेद अन्सारी अशोक बोबडे आदी उपस्थित होते ओबीसी मेळाव्यात बोलताना भानुदास माळी पुढे म्हणाले लोकसभेमध्ये बहुसंख्येने ओबीसी समाज हा महाविकास आघाडीच्या मागे होता त्यामुळेच महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात बहुमत मिळाले भाजप हा नेहमीच ओबीसींच्या डोळ्यात धूळ फेक करत आला आहेत काही काळ ओबीसी त्यांच्या भूलथापांना बळी पडला पण आज ओबीसी समाज महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत महात्मा फुले तसेच शिवाजी महाराजांबद्दल माजी राज्यपाल बोलले पण सत्ताधाऱ्यांनी यावरती चकार शब्द काढला नाहीत दुसरीकडे राहुल गांधी यांच्यावर वेगवेगळ्या केसेस लावल्या जातात निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महिन्याला पंधराशे रुपये देऊन आई बहिणीचा अपमान महायुती सरकार करीत आहेत आमचे सरकार आल्यास महिन्याला आठ हजार रुपये देण्याचे आमचे नेते राहुल गांधी यांनी कबूल केले होते शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात बांधण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले भूमिपूजनही झाले पण अजूनही शिवाजी महाराजांचे स्मारक झाले नाही आणि भूमिपूजनाला सोबत असणारेच आता अरबी समुद्रात महाराजांचे स्मारक शोधत आहे हा दुटप्पीपणा आहेत सिंधुदुर्ग मध्ये महाराजांचा पुतळा पडला पुतळा पूर्ण आतमधून पोकळ होता त्या पुतळ्यावरती करोडो रुपये खर्च करण्यात आले तरी तो पुतळा पडला शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत या दैवतांचा अपमान वारंवार महायुती सरकार हे करत आहेत हे अदानी आणि अंबानी चे सरकार आहेत शंभर रुपयाचा स्टॅम्प जाऊन आता पाचशे रुपयाचा स्टॅम्प सर्वसामान्य जनतेच्या माथी मारला जाणार आहेत या विरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रभर काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने अलीकडच्या काळात आंदोलन उभारले जाणार आहेत प्रीपेड विद्युत मीटर महाराष्ट्रात येऊ घातले आहेत याचे टेंडर अदानीला देण्यात आले आहेत मित्रांनो रात्री रिचार्ज संपल्यास रात्रीच तुमची लाईन जाणार आहेत हे दळभद्री सरकार आहेत आणि या सरकारला खाली खेचण्याची सुवर्णसंधी आपल्याला चालून आली आहेत निश्चितच त्याचे सोने आपल्याला करायचे आहेत यावेळी ऍड शिवाजीराव मोघे प्रा वसंत पुरके ऍड प्रफुल्ल मानकर तेलंगणाचे आमदार डॉक्टर रेड्डी बहादुरे यांनीही आपले विचार मांडले कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष इंजि अरविंद वाढोणकर यांनी केले संचालन कार्याध्यक्ष अनिल गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन सरचिटणीस प्राअनिल देशमुख यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष जया पोटे सरचिटणीस स्वाती येंडे सचिव प्रा डॉ अनिल देशमुख सचिव अशोक तिखे अध्यक्ष शहर ओबीसी विभाग प्रवीण सवाई तालुकाध्यक्ष राजेंद्र गावंडे राजू पोटे राम घोटेकर विलास वादाफळे शशांक केंढेआशिष महल्ले यांनी केले कार्यक्रमाला पुरुषांबरोबरच स्त्रियांचीही मोठी उपस्थिती होती
