
वरोरा शहरातील विकास नगर भागातील फुकट नगर येथे एका तरुणांची लाकडी दांड्याच्या साहाय्याने बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली
मृतक तरुण रितेश लोहकरे याचे वय अंदाजे 24 इतके असून हा याच भागातील रहिवासी आहे.
घटनास्थळापासून मृतक रितेश लोहकरे याचे घर 500 मीटर अंतरावर आहे.मात्र ही घटना घडत असताना कोणालाच कसे दिसले नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

अज्ञात व्यक्तींनी लाकडी दांड्याच्या साहाय्याने डोक्यावर वार करत हत्या केल्याने या परिसरात तणावाचे वातावरण आहे.
घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार अमोल काचोरे यांनी घटनास्थळी दाखल होत जागेची पाहणी केली.
मृतक तरुणाचा मृतदेह पोस्ट मोर्टम साठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठविण्यात आला आहे.याबाबत अधिक तपास वरोरा पोलीस करत आहे.
