
गावकऱ्यांच्या वतीने सत्कार
फुलसावंगी प्रतिनिधी-संजय जाधव
पोलीस व नागरिक या दोन घटका मध्ये सामंजस्य असणे अतिशय आवश्यक असून
लोक सहभागा मुळे लहान सहान अनेक गुन्ह्याना पायबंद लावता येतो.या आशया चे विचार महागाव पोलीस स्टेशन मध्ये नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक दीपक पाटील ढुमने यांनी व्यक्त केले ते फुलसावंगी येथील पोलीस चोकी मध्ये आयोजित सत्कार कार्यक्रमात बोलत होते.
मागील अनेक महिन्या पासून प्रभारी ठाणेदारा वर महागाव पोलीस स्टेशन ची भिस्त होती.ती आता पोलीस निरीक्षक दीपक पाटील ढुमने यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे.त्याच प्रमाणे फुलसावंगी बिट मध्ये ही खांदे पालट झाले असून फुलसावंगी बिटची धुरा पुन्हा बिट जमादार निलेश पेंढारकर यांच्या कडे सोपविण्यात आली आहे.या आधी त्यांनी फुलसावंगी बिट मध्ये यशस्वी कामगिरी केली आहे.त्याच्या हजेरीत फुलसावंगी मध्ये गुन्ह्याचे प्रमाण कमी करण्यात व इन्फॉर्मेशन नेटवर्क उभारण्यात मोठे यश पेंढारकर यांना मिळाले होते.आज येथील पोलीस चोकी मध्ये नव्याने पोलीस निरीक्षक पदी विराजमान झालेले दीपक पाटील ढुमने व निलेश पेंढारकर यांचे गावकऱ्यांच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आले.यावेळी पो.नि. यांनी फुलसावंगी मधील परिस्थिती जाणून घेण्याचा तसेच पोलीस विभागाच्या दृष्टीने कोणती काम करण्याची गरज आहे या बाबतीत माहिती घेतली.येथील नागरिकांनी फुलसावंगी येथे मिळत असलेला गांजा विक्री वर कारवाई करण्याची विनंती केली.अलीकडच्या काळात फुलसावंगी मध्ये गांजा तस्करी व विक्री ने उंचाक गाठला असून या वेसनाच्या आहारी बालक व तरुण जात आहे.वाहतूक नियंत्रण करण्याची गरज ही अनेकांनी या वेळी उपस्थिती केली.
या वेळी सरपंच नवाब जानी,विजय महाजन, रवी पांडे,बाबू खान,शमशेर खान लाला,गणेश भगत,विवेक पांढरे,मुन्ना नाईक,
उमेश जयस्वाल, शेख मजरहर,बंटी पठाण,संजय जाधव,शमीम कुंदन,आरिफ खान यांच्या सह मोठयाने संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन तसलीम शेख यांनी व आभार निलेश पेंढारकर यांनी मानले.
